Harbhajan Singh: माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन पूजा करतात. महाशिवरात्रीच्या निमित्तानं अनेकजण सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून आपले मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा देत आहेत. यातच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह शिवरात्रीनिमित्त इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात त्यानं हातावर महादेवांचा टॅटू काढल्याचं दिसत आहे. 


हरभजन सिंह शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यानं हातावर महादेवांचा टॅटू काढलाय. तसेच या व्हिडिओला त्यानं महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, असं कॅप्शन दिलंय. त्यानं शेअर केलेल्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जात आहे. 


हरभजन सिंहची इंस्टाग्राम पोस्ट-



हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीला उपास आणि शंकराची पूजा केली जाते. शंकराचे भक्त हे रात्रभर जागून शंकराची पूजा करतात. तसेच काही लोक ज्योतिर्लिंग तीर्थ यात्रेला देखील जातात.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha