Virat Kohli 100th Test : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली शुक्रवारी 04 मार्च रोजी श्रीलंका संघाविरुद्ध मोहाली येथील मैदानात 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. किंग कोहलीने आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले असून त्याच्या यावेळी त्याने 50.39 च्या शानदार सरासरीने 7 हजार 962 रन केले आहेत. तर या 100 व्या कसोटीपूर्वी त्याचे काही खास रेकॉर्ड जाणून घेऊ...


कोहलीच्या नावावर सर्वाधिक दुहेरी शतकं


टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक दुहेरी शतकं विराट कोहलीनेच लगावली आहेत. कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये सात दुहेरी शतकं लगावली आहेत. तर यामध्ये दुसऱ्या स्थानावर वीरेंद्र सेहवाग सहा दुहेरी शतकांसह आहे. तर जगभरातील क्रिकेटर्सचा विचार करता विराट या यादीत चौथ्या स्थानावर आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन पहिल्या (12 दुहरी शतकं), श्रीलंकेचा कुमार संगकारा (11 दुहेरी शतकं) दुसऱ्या आणि वेस्टइंडीजचा ब्रायन लारा (9 दुहरी शतकं) तिसऱ्या स्थानावर आहे. 


कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत सहावा


33 वर्षीय विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यां भारतीयांमध्ये सहाव्या स्थानावर आहे. भारताकडून पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर (15,921), दुसऱ्यावर राहुल द्रविड (13,265), तिसऱ्यावर सुनील गावस्कर (10,122), चौथ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण (8,781) आणि पाचव्या स्थानावर वीरेंद्र सेहवाग (8,503) आहे.


टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार


विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने 65 सामन्यातील 38 सामन्यांत विजय मिळवला आहे. जगात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्यांच्या यादीत दक्षिण आफ्रीकेचा ग्रीम स्मिथ (53), ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग (48) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ (41) कोहलीपुढे आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha