Sachin Tendulkar: भारतीय क्रिकेट चाहते 14 नोव्हेंबर 20154 ही तारीख कधीच विसरू शकणार नाहीत. कारण फक्त भारताचा नाही तर जागतिक क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं याच दिवशी निवृत्ती घेतली होती. सचिन तेंडुलकरनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय.ज्यामुळं त्याला क्रिकेटचा देव म्हणून संबोधलं जातं. नुकताच सचिन तेंडुलकरनं राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात तो स्ट्रेट ड्राईव्ह लावताना दिसत आहे. याबाबत अजून कोणत्याही फलंदाज सचिनला तोड देऊ शकला नाही.
भारताचे महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. याच दिवसाच्या निमित्तानं सचिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. ज्यात तो एका पेक्षा एक स्ट्रेड ड्राईव्ह खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून सचिन तेंडुलकरनं संपूर्ण देशातील नागिरकांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हिडिओ-
सचिननं आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?
"आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे आणि या दिवशी मी तो खेळ का खेळू नये? ज्यावर माझं खूप प्रेम आहे आणि ज्यासाठी मी खूप समर्पित आहे." सचिनचा हा व्हिडिओला आतापर्यंत लाखो अधिक युजर्सनं लाई यूजर्सनी लाइक्स केलं आहे. तर, पाच हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. सचिनचा हा व्हिडिओ पाहून अनेकजण त्याच्या स्ट्रेट ड्राईव्हचं कौतूक करत आहेत.
स्पोर्ट्स प्लेइंग नेशनबाबत काय म्हणाला?
सचिनने या व्हिडिओच्या आधी 'राष्ट्रीय क्रीडा दिना'ची एक खास पोस्टही शेअर केली होती. या पोस्टमध्ये तो भारताला 'स्पोर्ट्स प्लेइंग नेशन' बनवण्याबाबत बोलत आहेत. तो म्हणतोय की, कोणताही खेळ खेळण्यासाठी वय नसतं. प्रत्येकानं कोणता ना कोणता खेळ खेळला पाहिजे. त्यांनी या पोस्टमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लॉन बॉलमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंच्या चौकडीचाही उल्लेख केला आहे.
हे देखील वाचा-