Asia Cup 2022: यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषकातील तिसऱ्या सामन्यात बांग्लादेश आणि अफगाणिस्तान (Bangladesh vs Afghanistan) यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. मोहम्मद नबीच्या (Mohammad Nabi) नेतृत्वाखाली श्रीलंकेचा आठ विकेट्सनं पराभव केल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ बांग्लादेशशी भिडणार आहे. स्टार ऑलराऊंडर शाकीब हल हसनच्या (Shakib Al Hasan) नेतृत्वाखाली बांग्लादेशचा संघ या स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना खेळणार आहे. 


बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत 8 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी अफगाणिस्तानच्या संघानं पाच सामने जिंकले आहेत. तर, तीन सामन्यात बांग्लादेशच्या संघाला विजय मिळवता आलाय. आज शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणाऱ्या टी-20 सामन्यात कोणता संघ बाजी मारेल? हे पाहणं महत्वाचं ठरेल. 


बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.


बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?
बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल.


बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील लाईव्ह सामना कुठं आणि कसं पाहू शकतात?
बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्याीतील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. 


बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहता येणार?
बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.


संघ-


बांग्लादेश संघ:
मोहम्मद नईम, अनामूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसेन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, सब्बीर रहमान, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, मोसाद्देक हुसेन, तस्किन अहमद, मेहदी हसन मिराज, इबादोत हुसेन, परवेझ हुसेन इमॉन. 


अफगाणिस्तान संघ:
हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज(विकेटकिपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, मोहम्मद नबी(कर्णधार), रशीद खान, अजमातुल्ला उमरझाई, नवीन-उल हक, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, समिउल्ला शिनवारी, हशमतुल्ला शाहिदी, अफसर झझाई, फरीद अहमद मलिक, उस्मान गनी, नूर अहमद. 


हे देखील वाचा-