Smriti Irani On Hardik Pandya : रविवारची रात्र तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अगदी संस्मरणीय ठरली. टीम इंडियाने आशिया कप 2022 ची सुरुवात पाकिस्तानवर 5 गडी राखून (IND vs PAK) रोमांचक विजय मिळवून केली. या विजयाचा शिल्पकार ठरला, भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (hardik pandya). दरम्यान हार्दिकच्या या खेळीचं सर्वच भारतीय कौतुक करत असून भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी देखील हार्दीक पांड्याची सामन्यातील एक रिएक्शन शेअर करत त्याला भन्नाट कॅप्शन दिलं.


अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना पहिल्या तीन चेंडूत फक्त एक धाव निघाली. षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. पण हा षटकार मारण्यापूर्वी हार्दिक पांड्यानं दिलेल्या रिएक्शनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हार्दीक यावेळी जे काही टार्गेट आहे, ते नक्कीच करेन असं अगदी विश्वासाने न काही बोलता आपल्या रिएक्शनमधून दाखवून दिलं. हीच रिएक्शन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शेअर करत 'जेव्हा कोणी म्हणतं सोमवार आहे' असं कॅप्शन दिलं आहे. यातून एकप्रकारे सोमवारी अनेकांना काम करायचा कंटाळा आला असला तरी आपण असंच कॉन्फिडंट राहायला हवं असा संदेश त्यांनी देऊ केला आहे.






सामन्याचा लेखा-जोखा


सामन्यात आधी भारतानं (Team India) नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. पाकिस्ताननं 147 धावा केल्या. यावेळी मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) 43 आणि इफ्तिकारच्या 28 तसंच दहानीच्या याच्या स्फोटक 16 धावा पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या ठरल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 तर हार्दिक पांड्याने 3, अर्शदीपने 2 आणि आवेश खाननं एक विकेट घेतली. त्यानंतर पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं 46 चेंडूत 49 धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्मा 12 तर, विराट कोहली 35 धावा करून बाद झाला.


यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 52 धावांची भागेदारी झाली. अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झालाय. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजन सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाहनं पदार्पणाच्या सामन्यात दमदार प्रदर्शन करत भारताच्या दोन फलंदाजांना पव्हेलियनमध्ये धाडलं.  भारताचा पुढील सामना आता 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँग संघाविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे.


हे देखील वाचा-