एक्स्प्लोर

Ind Vs Eng 3rd T20 : वैभव सूर्यवंशीचा सराव करतानाचा वेदनादायी व्हिडिओ व्हायरल! चेंडू थेट बरगड्यांना लागला, तिसऱ्या टी-20 खेळणार की नाही?

Vaibhav Sooryavanshi Hit By Ball During Practice Session : क्रिकेट जगतात सध्या सर्वांच्या नजरा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यावर खिळल्या आहेत.

Vaibhav Sooryavanshi Hit By Ball During Practice Session : क्रिकेट जगतात सध्या सर्वांच्या नजरा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यावर खिळल्या आहेत. 4 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध पदार्पण करताच, तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे. पहिल्या सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त 14 धावा निघाल्या असल्या, तरी त्याच्याकडून लवकरच एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. परंतु, या सगळ्यात आता एक चिंताजनक व्हिडिओ समोर आला आहे. सरावादरम्यान वैभव गंभीररित्या दुखापतग्रस्त झाला असून वेदनेने मैदानावरच विव्हळत बसल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

सरावादरम्यान चेंडू थेट बरगड्यांना लागला!

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वैभव सूर्यवंशी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील थ्रोडाउन स्पेशलिस्ट राघवेंद्र द्विवेदी त्याला थ्रोडाउन देत होते. यादरम्यान एक वेगवान शॉर्ट-पिच चेंडू वैभवला नीट खेळता आला नाही आणि तो थेट त्याच्या बरगड्यांवर जाऊन लागला. चेंडूचा वेग इतका जास्त होता की, तो लागताच वैभव वेदनेने विव्हळत मैदानावरच खाली बसला. मात्र, व्हिडिओमध्ये राघवेंद्र त्याला पाहण्याऐवजी आधी चेंडू उचलण्यासाठी जाताना दिसत आहेत.

वैभव पुढचा सामना खेळू शकणार का?

या घटनेनंतर आता सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण झाला आहे की, वैभव सूर्यवंशीची दुखापत किती गंभीर आहे? यावर अद्याप बीसीसीआय किंवा संघ व्यवस्थापनाकडून (Team Management) कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. सरावादरम्यान खेळाडूंना अशा दुखापती अनेकदा होत असतात, ज्या प्राथमिक उपचारानंतर ठीक होतात. भारतीय संघ आणि क्रिकेट चाहते हीच प्रार्थना करत आहेत की वैभव तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा.

पहिल्या सामन्यात खेळली होती आक्रमक खेळी

वैभव सूर्यवंशीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 10 चेंडूंत 14 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, इंग्लंडचा घातक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या पहिल्याच चेंडूवर वैभवने खणखणीत षटकार ठोकला होता. तो एक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत दिसत होता, पण विल जॅक्सच्या ऑफ-स्पिनवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो यष्टीचित झाला. आता नॉटिंगहॅम येथे होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याच्याकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता सुरू होईल. आता सगळ्यांचे लक्ष वैभवच्या फिटनेस अपडेटकडे लागले आहे.

हे ही वाचा -

Team India Head Coach News : गौतम गंभीर OUT, VVS लक्ष्मण IN? इंग्लंड दौऱ्यानंतर बदलणार टीम इंडियाचा कोच; नेमकं कारण काय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
IND vs SL Playing XI 1st Test : सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
Embed widget