Rishabh Pant Accident : अपघातानंतर गाडीबाहेर कसा पडला ऋषभ? दुर्घटनेनंतर पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Rishabh Pant Health Update : अपघातानंतर ऋषभ पंतची आता प्रकृती स्थिर आहे. पंतच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
![Rishabh Pant Accident : अपघातानंतर गाडीबाहेर कसा पडला ऋषभ? दुर्घटनेनंतर पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला... uttarakhand roorkee rishabh pant Accident does not remember how he got out of car rishabh pant car accident Rishabh Pant Accident : अपघातानंतर गाडीबाहेर कसा पडला ऋषभ? दुर्घटनेनंतर पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/c1b433b1ccd6587a2eb87e34e4db38f4167239617330977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतचा (Rishabh Pant) शुक्रवारी भीषण अपघात झाला. अपघातानंतर ऋषभ पंतची आता प्रकृती स्थिर (Rishabh Pant Health Update) आहे. पंतच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्या मेंदूला आणि पाठीच्या कण्याला कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान, आता अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीहून परतताना उत्तराखंडमध्ये हम्मदपूरजवळ पंतचा अपघात झाला.
अपघातानंतर गाडीबाहेर कसा पडला ऋषभ?
ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर त्याला घटनास्थळावरून स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतील पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ऋषभने एका पोलीस अधिकाऱ्याला सांगितले की, तो गाडीतून कसा बाहेर पडला हे काहीही त्याला आठवत नाही. मीडिया रिपोर्टनुसार, सहायक पोलीस आयुक्त देहात स्वप्ना किशोर सिंह यांनी एका वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे. ऋषभने पोलिसांना सांगितलं की, ऋषभ गाडीतून कसा उतरला? याबाबत त्याला काहीही आठवत नाही. ऋषभ इतका ट्रॉमामध्ये होता की त्याला काहीच आठवत नव्हते.
अपघातानंतर ऋषभ ट्रॉमामध्ये होता
मिळालेल्या माहितीनुसार, अशा गाडीमध्ये अपघातानंतर सहसा काही सेकंदात आग लागते. गाडीला आग लागण्यापूर्वी ऋषभ स्वतः दरवाजा उघडून बाहेर आला असेल का? यावर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पद्धतीने कारला आग लागली. तेवढ्या वेळेत एतक कुणीही गाडीजवळ जाऊन ऋषभला बाहेर काढण्याची शक्यता फार कमी आहे. ऋषभचा अपघात किती भीषण होता हे, गाडीची अवस्था आणि व्हायरल फोटोमधून (येथे पाहा) तुम्हाला कळेल. त्यामुळे अपघातानंतर ऋषभ शॉकमध्ये होता आणि त्याला त्यावेळी नेमकं काय घडले हे आठवत नाहीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ऋषभ स्वत: गाडीतून बाहेर पडला असावा किंवा अपघातानंतर आग लागण्यापूर्वी कुणीतरी लगेचच गाडीपर्यंत पोहोचला असावा आणि त्याने गाडीतून बाहेर काढले असेल. अपघातानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये गाडीने पेट घेतला आणि आगीत कार जळून खाक झाली.
मीडिया रिपोर्टनुसार, अपघाताच्या वेळी ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता आणि पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची खिडकी तोडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. पण त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)