(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'कॅप्टन कूल'ला भेटला युनिव्हर्स बॉस, धोनी अन् गेलच्या भेटीचे फोटो व्हायरल
Chris Gayle Meets MS Dhoni : युनिव्हर्स बॉस अर्थात ख्रिस गेल यानं नुकतीच कॅप्टन कूल एम एस धोनीची भेट घेतली.
Chris Gayle Meets MS Dhoni : युनिव्हर्स बॉस अर्थात ख्रिस गेल (Chris Gayle) यानं नुकतीच कॅप्टन कूल एम एस धोनीची (MS Dhoni) भेट घेतली. गेल याने या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ख्रिस गेल याने धोनीसोबतचा तीन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करताना गेल याने कॅप्शनमध्ये ‘लॉन्ग लिव द लीजेंड.’ असेही लिहिलेय. धोनीला त्यानं टॅगही केलेय. दोन्ही दिग्गज खेळाडू या फोटोमध्ये कूल दिसत आहेत.. मिळालेल्या माहितीनुसार, एका जाहिरातीसंदर्भात दोन्ही दिग्गज खेळाडूंची भेट झाली आहे.
वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेल यानं धोनीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. गेल याच्या या पोस्टला आतापर्यंत जवळपास तीन लाख लोकांनी लाईक केलेय. तर एक हजारांपेक्षा जास्त कमेंट्स केल्या आहेत... सर्वसामान्य क्रीडा प्रेमीसह अनेक सेलिब्रेटींनीही गेलच्या पोस्टवर लाईक अन् कमेंट्स केली आहे. रॅपर एमव्ही बंटाई यानेही या फोटोवर कमेंट केली आहे. थाला आणि युनिवर्स बॉस यांचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. धोनी सोशल मीडियावर जास्त सक्रीय नाही, मात्र चाहत्यांमध्ये त्याची खूप क्रेझ आहे.
ख्रिस गेल याची इन्स्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
दोन्ही दिग्गजांचं करिअर कसं राहिलेय?
थाला अर्थात एमएस धोनी याने 90 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. त्याशिवाय 350 एकदिवसीय आणि 98 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटीत धोनीनं 4876, वनडेमध्ये 10773 आणि टी20 मध्ये 1617 धावांचा पाऊस पाडलाय. धोनीनं आपल्या करिअरमध्ये 16 शतके आणि 108 अर्धशतकं झळकावली आहेत. धोनीला जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखलं जातं.
ख्रिस गेल याने वेस्ट इंडीजसाठी 103 कसोटी, 301 वनडे आणि 79 टी 20 सामने खेळले आहेत. त्यानं कसोटीत 7214, वनडेमध्ये 10480 आणि टी20 मध्ये 1899 धावांचा पाऊस पाडलाय. गेल याने 483 आंतरराष्ट्रीय सामन्यात 42 शतकं आणि 105 अर्धशतकं झळकावली आहेत. जगातील विस्फोटक सलामी फलंदाजामध्ये गेल याचे नाव घेतलं जातं.