IND U19 vs AUS U19 Live: अंडर 19 विश्वचषकाची सेमीफायनल सुरु, भारताचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय
IND U19 vs AUS U19 Semi Final Match :अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व फेरीत बांग्लादेशचा मात देत सेमीफायनलमध्ये आलेल्य भारताचा आज सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे.
IND U19 vs AUS U19 Live : भारताचा अंडर 19 संघ (U19 Team India) सध्या अंडर 19 विश्वचषकात (Under 19 World Cup) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियातील अंटीगा येथील कूलीज क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारतीय संघात कोरोनाचं संकट आल्यानंतरही भारताने आपली कामगिरी सुरुच ठेवली. भारताने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गतविजेत्या बांग्लादेशचा पाच विकेट्सनी पराभव केला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने देखील बलाढ्य पाकिस्तानला नमवून सेमीफायनलमध्ये स्थान मिळवल्याने आजचा सामना अटीतटीचा होण्याची दाट शक्यता आहे.
सामन्यासाठी भारताचे अंतिम 11 -
अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग, शेख रशीद, यश धुल (कर्णधार), निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बाना (यष्टीरक्षक), राजवर्धन हंगर्गेकर, विकी ओस्तवाल, रवी कुमार
सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे अंतिम 11 -
कॅम्पबेल केलवे, टीग वायली, कोरे मिलर, कूपर कॉनोली (कर्णधार), लचलान शॉ, निवेथन राधाकृष्णन, विल्यम साल्झमन, टोबियास स्नेल(यष्टीरक्षक), जॅक सिनफिल्ड, टॉम व्हिटनी, जॅक निस्बेट
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा प्रवास
भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले. यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि मानव पारीख आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. युगांडाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही खेळले नव्हते. मात्र, संघाच्या बेंच स्ट्रेंथच्या जोरावर भारताने हे सामने सहज जिंकून गटातील अव्वल संघ म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यादरम्यान धुळच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूनं संघाची कमान सांभाळली होती.
हे देखील वाचा-
- IPL 2022 Player Auction List Announced: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये 590 खेळाडूंवर लागणार बोली; कोणत्या संघाकडं किती पैसे शिल्लक? पाहा संपूर्ण यादी
- IPL Mega Auction 2022: कगिसो रबाडा मालामाल होणार, आकाश चोप्राची भविष्यवाणी
- Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच मैदानात, 'या' चार शहरांमध्ये खेळवले जातील सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha