South Africa Tour Of India: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला येत्या 28 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघात बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत भारताचा वेगवान युवा गोलंदाज उमरान मलिकचं (Umran Malik) संघात पुनरागमन होण्याची शक्यता वाढलीय. भारताचा वेगवान अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) अजूनही कोरोना झुंज देतोय. त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत खेळण्याची शक्यता फार कमी आहे. मोहम्मद शामीच्या जागेवर उमरान मलिकला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. 

नुकतीच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत मोहम्मद शामीची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, या मालिकेपूर्वी त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. ज्यामुळं त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर पडावं लागलं. मोहम्मद शामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेपूर्वी बरा होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिलेल्यामाहितीनुसार, मोहम्मद शामी अजूनही कोरोनामुक्त झाला नाहीये. वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत मोहम्मद शामीच्या जागेवर उमेश यादवला संघात निवड झाली. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, पण या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत उमरान मलिकला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलंय. मोहम्मद शामी कोरोनातून न सावरल्यास उमरानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात उमरान मलिकनं जबरदस्त गोलंदाजी केली होती. ज्यामुळं त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. उमरान मलिकनं भारतासाठी आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले आहेत. परंतु, इकोनॉमी रेट अधिक असल्यानं त्याला इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात आलं. 

भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक: 

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 28 सप्टेंबर 2022 तिरुवनंतपुरम 
दुसरा टी-20 सामना 2 नोव्हेंबर 2022 गुवाहाटी
तिसरा टी-20 सामना 4 ऑक्टोंबर 2022 इंदूर

 

हे देखील वाचा-