India Beats Australia: सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) वादळी खेळीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केलाय. हैदराबादच्या (Hyderabad) राजीव गांधी स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 187 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं 19.5 षटकातच सामना जिंकला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकलीय.
ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा सलामीवीर केएल राहुल अवघ्या एका धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर रोहित शर्मानं भारतीय संघाची धावसंख्या पुढं नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तोही बाद झाला. यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचा विडा उचलत संघाचा डाव सावरला. दरम्यान, चौदाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार झेल बाद झाला. पण विराट कोहलीनं एक बाजू संभाळून भारताच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेला. मात्र, अखेरच्या पाच चेंडूत पाच धावांची गरज असताना त्यानं डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर आपली विकेट्स गमावली. भारताला दोन चेंडूत चार धावांची गरज असताना हार्दिक पांड्यानं चौकार मारून संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्सनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, जोश हेजलवूड आणि अॅडम झम्पाला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
ट्वीट-
कॅमेरून ग्रीन- टीम डेव्हिडची अर्धशतकी खेळी व्यर्थ
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची चांगली सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर कॅमेरून ग्रीन आणि आरोन फिंचनं पहिल्या तीन षटकात 10 च्या सरासरीन धावसंख्या 30 च्या पुढं नेली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 44 वर असताना आरोन फिंच बाद झाला. मात्र, त्यानंतरही कॅमेरून ग्रीननं आक्रमक खेळी सुरुच ठेवली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील पाचव्या षटकातील अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारनं कॅमरूनला बाद करून भारताला दुसरी विकेट्स मिळवून दिली. स्टीव्ह स्मिथ (10 चेंडू 9 धावा), ग्लेन मॅक्सवेल (11 चेंडू 6 धावा), जोश इंग्लिस (22 चेंडू 24 धावा), मॅथ्यूवेड (0) स्वस्तात माघारी परतले. मात्र, अखेरच्या काही षटकात टीम डेव्हिड आणि डॅनियल सॅम्सनं जोरदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला 187 धावसंख्येपर्यंत पोहचवलं. भारताकडून अक्षर पटेलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स प्राप्त झाली.
भारताची नव्या विक्रमाला गवसणी
ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय.टी-20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. बाबर आझमच्या संघानं गेल्या वर्षी एकूण 20 सामने जिंकले होते. तर, यावर्षी 9 महिन्यांत भारतानं 21 सामने जिंकून पाकिस्तानचा हा विश्वविक्रम मोडलाय.
हे देखील वाचा-