IND vs SA: टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ मायेदशात दक्षिण आफ्रिकेशी (India Vs South Africa) तीन सामन्यांची टी-20 आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला येत्या 28 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आलीय. भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) अजूनही कोरोनाशी झुंज देतोय. यामुळं मोहम्मद शामीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेला मुकावं लागणार असल्याची शक्यता वाढलीय.
नुकतीच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी खराब प्रदर्शन केलंय. त्यानंतर मोहम्मद शामीची भारतीय संघात पुनरागमन झालं. परंतु, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली. ज्यामुळं त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर पडावं लागलं. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेपूर्वी मोहम्मद शामी संघात परतेल, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, बीसीसीआयच्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शामी अजूनही कोरोनामुक्त झाला नाही. वेद्यकीय टीम त्याची देखरेख करत आहे. मोहम्मद शामी ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी बरा होईल, अशी आशा आहे.
उमरान मलिकला संधी मिळण्याची शक्यता
भारताच्या टी-20 विश्वचषकात मोहम्मद शामीचा राखीव खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आलाय. मोहम्मद शामीनं गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकानंतर भारतासाठी एकही टी-20 सामना खेळला नाही. परंतु, त्याच्या अनुभवाच्या जोरावर त्याला राखीव खेळाडूंमध्ये संधी देण्यात आलीय. शामी न खेळल्यास भारतानं आपला बॅकअप प्लॅन तयार केलाय. शामी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेसाठी तंदुरुस्त नसेल तर, उमरान मलिकचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकतं. इंग्लंड दौऱ्यानंतर उमरान मलिकला भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं.
भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 28 सप्टेंबर 2022 | तिरुवनंतपुरम |
दुसरा टी-20 सामना | 2 नोव्हेंबर 2022 | गुवाहाटी |
तिसरा टी-20 सामना | 4 ऑक्टोंबर 2022 | इंदूर |
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 6 ऑक्टोंबर 2022 | लखनौ |
दुसरा एकदिवसीय सामना | 9 ऑक्टोंबर 2022 | रांची |
तिसरा एकदिवसीय सामना | 11 ऑक्टोंबर 2022 | दिल्ली |
हे देखील वाचा-