एक्स्प्लोर

मैदानावर रक्ताचा सडा! रन आऊटच्या वादातून अंपायरला चाकूने वार करून संपवलं; क्रिकेट विश्वाला हादरवून सोडणारी घटना

Cricket Match Turns Fatal : भारतामध्ये एका बाजूला आयपीएलचा 2026 (Indian Premier League) थरार शिगेला पोहोचला आहे.

Cricket Match Turns Fatal : भारतामध्ये एका बाजूला आयपीएलचा 2026 (Indian Premier League) थरार शिगेला पोहोचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि पंजाब किंग्सच्या धडाकेबाज कामगिरी करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आंध्र प्रदेशातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यात अंपायरची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

रन आऊटच्या वादातून अंपायरला चाकूने संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एका स्थानिक क्रिकेट सामन्यात 21 वर्षीय डोला अजित बाबू आपल्या मित्र बुडूमुरी चिरंजीवीसोबत अंपायरिंग करत होता. सामन्यादरम्यान रनआउटच्या निर्णयावरून खेळाडूंमध्ये वाद निर्माण झाला. मात्र अजित बाबू आणि चिरंजीवी यांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली. यानंतर कांता किशोर नावाच्या एका प्रेक्षकाने संतापाच्या भरात अंपायर आणि खेळाडूंशी वाद घालत शिवीगाळ केली. 

पोलिसांच्या माहितीनुसार, सामना संपल्यानंतर कांता किशोरने वाद मिटवण्याच्या बहाण्याने अंपायरांना दुसऱ्या ठिकाणी बोलावले. अजित बाबू आणि चिरंजीवी काही मित्रांसह त्या ठिकाणी गेले, पण तिथे पुन्हा वाद चिघळला. याच दरम्यान कांता किशोरने चाकू काढून दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात अजित बाबू यांच्या छातीत वार करण्यात आला, ज्यामुळे तो घटनास्थळीच कोसळला. स्वतःचा बचाव करताना चिरंजीवी गंभीर जखमी झाला. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका व्यक्तीलाही दुखापत झाली.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजित बाबूची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना Apollo Hospital येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा -

MS Dhoni Fitness Test IPL 2026 : आधी टेस्ट, मगच एन्ट्री! सलग 3 पराभवांच्या नामुष्कीनंतर MS धोनी मैदानात उतरणार, पण अट ऐकून सगळेच चक्रावले

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget