(Source: ECI/ABP News/ABP Majha)
U19 World Cup: भारतीय संघाची दमदार सुरूवात; श्रीलंकेवर 90 धावांनी मिळवला विजय
भारतीय संघाने श्रीलंकेला 207 धावांमध्ये माघारी पाठवत 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला आहे.
ब्लॉफोन्टेन : गतविजेत्या भारतीय संघाने 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. भारताने रविवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेविरूद्ध 90 धावांनी विज मिळवला आहे. भारताने मानगाउंग ओव्हलवर सर्वात आधी फलंदाजी करत 50 ओव्हर्समध्ये चार विकेट्स गमावत 297 धावांचं आव्हान श्रीलंकेसमोर ठेवलं. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला 45.2 ओव्हर्समध्ये 207 धावांमध्ये माघारी पाठवलं. भारताने रविवारी झालेल्या लढतीत श्रीलंकेवर 90 धावांनी विजय मिळवला आहे.
India Under 19 kick off #U19CWC campaign with a 90-run win over Sri Lanka Under 19. 👏👏 Report 👉👉https://t.co/rWHJJun7fy#INDvSL pic.twitter.com/pRPv3KrFh1
— BCCI (@BCCI) January 19, 2020
भारताचे फलंदाज यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, प्रियम गर्ग व सिद्धेश वीरच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेसमोर 297 धावांचं आव्हान ठेवलं. यशस्वी आणि दिव्यांश यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दिव्यांशने 27 चेंडूत 23 धावा केल्या, तर यशस्वीने 74 चेंडूत 59 धावा केल्या. या दोघानंतर कर्णधार प्रियांक गर्ग आणि तिलक वर्मा यांनी भारताचा डाव सावरला. तिलक वर्मा मात्र आपलं अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. तो 46 धावांवर माघारी परतला. गर्गने 72 चेंडूत 56 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सिद्धेशने 27 चेंडूत 6 चौकार आणि एक षट्कारासह नाबाद 44 धावा केल्या. ध्रुव जुरेल याने आपलं अर्धशतक पूर्ण करत 48 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या.
श्रीलंकेच्या फलंदाजांनी सुरुवात चांगली केली पण विजय मिळवू शकले नाहीत. श्रीलंकेचा कर्णधार निपुण धनंजयने अर्धशतकी खेळी केली. त्याने 59 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एक षट्कार ठोकत 50 धावा केल्या. राविंडु रसांथा मात्र आपलं अर्धशतक करण्यास अयशस्वी ठरला. कामिला मिसारानेही 39 धावांचं योगदान दिलं. परंतु, त्यानंतर आलेल्या फलंदाजांना फारशी चांगली खेळी करता आली नाही.
दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 207 धावांमध्ये माघारी पाठवलं. सुशांत मिश्राने सलामीवीर नवोद परनविथाला अवघ्या सहा धावांतच बाद केलं. त्यानंतर कमिल मिसाराला 39 धावांमध्ये तर कर्णधार निपुण धनंजयाने अर्धशतकी खेळी केली.
संबंधित बातम्या :
माजी क्रिकेटर बापू नाडकर्णींचं निधन, सचिन आणि गावस्करांकडून आदरांजली
माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांना टीम इंडियाची मैदानावर अनोखी आदरांजली
INDvsAUS | टीम इंडियाचा मालिका विजय, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, रोहित, विराटची शानदार फलंदाजी
India vs Australia | रोहित शर्माचा नवा विक्रम, जलद 9 हजार धावांचा टप्पा पार