Women’s Team India Dance On Katrina Kaif Song: भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच पार पडलेला अंडर-19 महिला T20 विश्वचषक भारतीय संघानं जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या (Under-19 Women T20 World Cup 2023)  इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं विजय मिळवला. आता हा सामना जिंकल्यानंतर भारताच्या अंडर 19 महिला संघाने जबरदस्त सेलिब्रेशन केले. 


'काला चष्मा'वर थिरकला भारतीय महिला क्रिकेट संघ 


अंडर 19 महिला टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघानं जोरदार सेलिब्रेशन केले. त्यांच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ नुकताच आयसीसीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये अंडर 19 भारतीय महिला क्रिकेट संघ हा कतरिना कैफच्या काला चष्मा या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओवर 'न्यू काला चष्मा चॅम्पियन्स' असं लिहिलेलं दिसत आहे. या व्हिडीओमधील महिला क्रिकेटर्सच्या डान्स स्टेप्सनं अनेकांचे लक्ष वेधले. क्रिकेट प्रेमींनी या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन या भारतीय महिला क्रिकेट संघाचं कौतुक केलं आहे. तसेच, अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


पाहा व्हिडीओ : 






भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-19 महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं संपूर्ण इंग्लंड संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं. त्यानंतर भारतीय संघानं 69 धावाचं माफक आव्हान केवळ तीन विकेट्सच्या बदल्यात 14 षटकात पूर्ण करत सामना आणि विश्वचषक जिंकला आहे. 


काला चष्मा गाण्याचा ट्रेंड


काला चष्मा गाण्यावर डान्स करायचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून नेटकरी फॉलो करत आहेत. अनेक नेटकरी या गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. क्रिकेटपटू  शिखर धवननं देखील काला चष्मा गाण्यावरील क्रिकेटसंघाच्या डान्सचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. काला चष्मा हे गाणे 'बार बार देखो' या चित्रपटातील आहे. हा चित्रपट  2016 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Viral Video : देशी गाण्यावर विदेशी तडका, बॉलिवूड गाण्यावरील विदेशी डान्स ग्रुपचा व्हिडीओ व्हायरल