एक्स्प्लोर

बुमराह अन् विराटशी मैदानात वाद घालणाऱ्या 19 वर्षाच्या पोराचा संघातून पत्ता कट! 'या' धडाकेबाज फलंदाजाला मिळाली मोठी जबाबदारी

Sri Lanka vs Australia 1st Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करणारा ऑस्ट्रेलियन संघ आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे.

Sri Lanka vs Australia Test Series : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करणारा ऑस्ट्रेलियन संघ आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. येथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल, जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असेल. पण, या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स संघात नाही, त्यामुळे स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दरम्यान, सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार स्टीव्ह स्मिथने त्याच्या काही शब्दांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. पहिल्या कसोटीत संघाला एक नवीन सलामी जोडी मिळणार, असे तो म्हणाला. म्हणजेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीशी मैदानात वाद घालणाऱ्या खेळाडूला संघातून वगळले जाऊ शकते. अद्याप प्लेइंग इलेव्हनची घोषणा झालेली नाही.

29 जानेवारी पहिला कसोटी सामना!

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 29 जानेवारी रोजी गॅले येथे खेळला जाईल. यासाठी ऑस्ट्रेलियन संघ तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, स्टीव्ह स्मिथने सांगितले आहे की, पहिल्या सामन्यात उस्मान ख्वाजासोबत ट्रॅव्हिस हेड डावाची सुरुवात करेल. पण, यापूर्वी जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती, तेव्हा नॅथन मॅकस्विनी आणि सॅम कॉन्स्टास यांनी उस्मान ख्वाजासोबत आलटून पालटून फलंदाजी केली होती, परंतु आता चित्र बदलले आहे. याचा अर्थ असा की नॅथन मॅकस्वीनी किंवा सॅम कॉन्स्टास हे दोघेही सलामीला दिसणार नाहीत. अशा परिस्थितीत, त्यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान म्हणजेच बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान सॅम कॉन्स्टसचा भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी वाद झाला, त्यानंतर त्याला सर्व बाजूंनी टीकेला सामोरे जावे लागले.

उस्मान ख्वाजासोबत ट्रॅव्हिस हेड देणार सलामी!

खरं तर, 2023 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला तेव्हा उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी डावाची सुरुवात केली आणि ते यशस्वीही झाले. आणि भारत आणि श्रीलंकेतील खेळपट्ट्या जवळजवळ सारख्याच आहेत, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पुन्हा त्याच सूत्राने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही ट्रॅव्हिस हेडचे कौतुक केले आणि म्हटले की, तो भारताविरुद्ध नवीन चेंडूने खूप चांगला खेळला होता. दरम्यान, जेव्हा स्टीव्ह स्मिथला पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने नकार दिला. म्हणजेच सकाळी सामना सुरू होण्यापूर्वी टॉस झाल्यावरच संघाची घोषणा केली जाईल.

सॅम कॉन्स्टास की नॅथन मॅकस्वीनी कोणाला मिळाणार संधी?

सॅम कॉन्स्टासला अद्याप प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलेले नाही, परंतु सॅम कॉन्स्टास आणि नॅथन मॅकस्वीनी हे दोघेही या सामन्यात दिसणार नाहीत हे निश्चित आहे. ट्रॅव्हिस हेड डावाची सुरुवात करण्यासाठी येत असल्याने, पाचव्या क्रमांकाची जागा रिकामी होईल आणि ऑस्ट्रेलियन येथे कोणाला खेळण्यासाठी पाठवतात हे पाहणे बाकी आहे. सॅम कॉन्स्टासबद्दल स्टीव्ह स्मिथने म्हटले आहे की जर, त्याला श्रीलंकेविरुद्ध खेळायचे असेल तर त्याला खूप सराव करावा लागेल. या मालिकेला फारसे महत्त्व नसले तरी श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियन संघ कसा खेळतो हे पाहणे निश्चितच मनोरंजक आहे.

हे ही वाचा -

Gongadi Trisha : 19 वर्षाच्या पोरीने गाजवलं मैदान! ठोकलं पहिलं शतक अन् रचला इतिहास, आजवर कुणाला न जमलेली केली कामगिरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 March 2025Anmol Ratna Award 2025 | माधुरी सोलारचे CEO ठरले महाराष्ट्राचे अनमोल रत्न, संपूर्ण यशोगाथा माझावरNagpur DCP Niketan Kadam:हल्लेखोरांना रोखण्यासाठी जीवाची बाजी लावणारे पोलीस अधिकारी माझावर EXCLUSIVEEknath Shinde : उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, शिंदेंचे सभागृहात सर्वात मोठे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
Nitesh Rane & Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
Embed widget