Tim David : सिंगापूरकडून 14 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यानंतर आता ऑस्ट्रेलियाकडून खेळणार; टीम डेव्हीड पदार्पणासाठी सज्ज
भारताविरुद्ध मंगळपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. यावेळी टीम डेव्हीड आपला ऑस्ट्रेलियाकडून पहिला-वहिला सामना खेळू शकतो.

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 20 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने (Australia Cricket Team) सरावही सुरू केला आहे. दरम्यान यावेळी ऑस्ट्रेलिया संघातील एका खेळाडूवर सर्वांच्याच नजरा असणार आहेत. हा खेळाडू म्हणजे आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये दमदार कामगिरी केलेला टीम डेव्हिड (Tim David).
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघात एक नवा खेळाडू मैदानात उतरेल. त्याने आतापर्यंत सिंगापूरसाठी 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून आता तो ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणासाठी सज्ज झाला आहे, अशी चर्चा सुरु असणारा खेळाडू म्हणजेत टीम. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा टीम आता ऑस्ट्रेलियाकडून नेमकी कशी कामगिरी करेल? याकडे अनेकांचं लक्ष आहे. टी-20 मध्ये त्याची सरासरी 46.50 इतकी आहे. त्याच वेळी, त्याचा स्ट्राईक रेट देखील 158 इतका राहिला आहे. आयपीएल 2022 मध्ये, मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिडला नियमित संधी दिली आणि त्याने जबरदस्त फटकेबाजी केली. या हंगामात खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांमध्ये डेव्हिडने 216.27 च्या स्ट्राइक रेटने 186 धावा केल्या. या दरम्यान त्याने 16 षटकार आणि 12 चौकारही मारले. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाकडूनही तो अशीच कामगिरी करतो का? हे पाहावे लागेल.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघ:
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.
भारत- ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. तर दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात खेळला जाईल. या दौऱ्यातील तिसरा आणि अंतिम सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये यजमानांशी होणार आहे.
| सामना | तारीख | ठिकाण |
| पहिला टी-20 सामना | 20 सप्टेंबर 2022 | मोहाली |
| दुसरा टी-20 सामना | 23 सप्टेंबर 2022 | नागपूर |
| तिसरा टी-20 सामना | 25 सप्टेंबर 2022 | हैदराबाद |
हे देखील वाचा-




















