Hardik Pandya : भारताला मोठा धक्का, हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त, मैदान सोडावं लागलं
Hardik Pandya, World Cup 2023 : पुण्यात भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये सामना सुरु आहे. पण या सामन्यादरम्यान भारताला मोठा धक्का बसला आहे.
Hardik Pandya, World Cup 2023 : पुण्यात भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये सामना सुरु आहे. पण या सामन्यादरम्यान भारताला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला दुखापत झाली आहे. गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी मैदानावर येत हार्दिक पांड्यावर उपचार केले. पण हार्दिकला आराम मिळाला नाही. तो पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी तयार झाला, पण दुखापत बळावली. त्यामुळे हार्दिक पांड्याला मैदान साडून परत तंबूत जावे लागले.
हार्दिक पांड्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणताही अपडेट आलेली नाही. हार्दिक पांड्यामुळे भारतीय संघ संतुलीत होतो. गोलंदाजीसोबत हार्दिक फलंदाजीही करतो. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत आता सर्व मदार शार्दूल ठाकूर याच्यावर असेल.
आठ षटकांपर्यंत जसप्रीत बुमारह आणि मोहम्मद सिराज यांनी बांगलादेशच्या सलामी फलंदाजांना हात उघडून दिले नव्हते. नववे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला. पहिला चेंडू निर्धाव फेकला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार गेला. तिसरा चेंडू फेकल्यानंतर हार्दिक पांड्याला दुखापत झाली. हार्दिक पांड्या चेंडू अडवण्यासाठी गेला, पण त्याचवेळी त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. फिजिओ तात्काळ मैदानात आले. त्यांनी उपचार केले. हार्दिक पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी गेला. पण त्याची वेदना वाढली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. हार्दिक पांड्याच्या षटकातील तीन चेंडू टाकण्यासाठी विराट कोहली आला. विराट कोहलीने सहा वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली. विराट कोहलीने तीन चेंडूमध्ये दोन धावा दिल्या.
Hardik Pandya going off...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2023
- Hoping he is alright soon. pic.twitter.com/OaD2E8dz2Q
नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने
पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शन्तो याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या माऱ्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. आजच्या सामन्यात टीम इंडियामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम उतरवण्यात आला आहे.
बांगलादेशविरोधात भारताचे 11 शिलेदार -
बांगलादेशचे शिलेदार कोणते ?
लिट्टन दास, तंजीद हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर), महमूदुल्लाह, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम