BCCI May Stop Tobacco Ads: भारतात खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामन्यांदरम्यान, मैदानात अनेकदा 'तंबाखू' आणि 'गुटखा'च्या जाहिराती दिसतात. अनेक मैदानं आयपीएलसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे आयोजन करताना पान मसाला आणि गुटख्यांसह धुरविरहित तंबाखू उत्पादनांच्या डाहीराती प्रदर्शित करतात.
'तंबाखू' आणि 'गुटखा'च्या जाहिरातींमधून चांगली कमाई होते. पण समोर आलेल्या एका अहवालात आता स्टेडियममध्ये दाखवल्या जाणाऱ्या 'तंबाखू' आणि 'गुटख्या'च्या जाहिराती बंद करणार असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय या जाहिरातींबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय बीसीसीआयला मैदानावर तंबाखूच्या जाहिराती बंद करण्यास सांगण्याचा विचार करत आहे. तसेच कलाकार आणि माजी क्रिकेटपटू तंबाखू उत्पादन निर्मात्यांद्वारे निर्मित इलायची माऊथ फ्रेशनर्सच्या जाहीराती करताना दिसत आहे. त्यामुळे माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलकार करत असलेल्या गुटखाच्या सरोगेट जाहीराती थांवण्याची विनंती देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालय बीसीसीआयला करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये कोणत्याही सेलिब्रेटीकडून प्रचार करणाऱ्या जाहिराती बंद करण्यावर अधिक भर देण्यात आला. नाव न सांगण्याच्या अटीवर एका सूत्राचा हवाला देऊन अहवालात म्हटले आहे की, युवा लोकांमध्ये क्रिकेटचे सामने खूप लोकप्रिय आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात क्रिकेट सामन्यांदरम्यान तंबाखूच्या जाहिराती दाखवल्या जात आहेत आणि सेलिब्रिटींकडून त्याचे समर्थन केले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून हे थांबवण्यासाठी पाऊलं उचलली जात आहे.
जाहिरातींचा तरुणांवर परिणाम-
एकदिवसीय विश्वचषक ही क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. 2023 मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले होते. अशा मोठ्या टूर्नामेंटमध्ये तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहिरातींचा परिणाम तरुणांवर जास्त होतो. तंबाखू उत्पादनाच्या जाहीरातींवर बंदी घालण्यापासून वाचवण्यासाठी तंबाखू उत्पादक कंपन्या गुटख्याची पान मसाला म्हणून जाहीरात करतात.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'
केकेआरला सोडलं, टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला; शाहरुख खान-गौतम गंभीरची भेट होताच काय घडलं?