Gautam Gambhir Meet Shahrukh Khan: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नादरम्यान गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांची भेट झाली. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनलेल्या गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) मालक शाहरुख खानला पाहताच त्याला मिठी मारली. गौतम गंभीर आणि शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 


व्हिडीओमध्ये नेमकं काय?


गौतम गंभीर आणि शाहरुख खान एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. पुढे व्हिडीओमध्ये गंभीरची पत्नी नताशाही शाहरुख खानला भेटल्याचे दिसून येते.






गंभीरने केकेआरची सोडली साथ-


गंभीर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारे इतर संघाशी जोडले जाऊ शकत नाहीत. 2024 च्या आयपीएलमध्ये गंभीर कोलकाताचा मेंटर म्हणून दिसला होता. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने ट्रॉफी जिंकली. अशा परिस्थितीत गंभीरच्या अनुपस्थितीमुळे केकेआरला येत्या हंगामात मोठे नुकसान होऊ शकते. केकेआरने आतापर्यंत तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे आणि गंभीर तिन्ही वेळा संघासोबत होता. गंभीरने दोनदा कर्णधार म्हणून कोलकात्याला चॅम्पियन बनवले आणि एकदा गंभीरच्या मार्गदर्शनाखाली नाइट रायडर्स चॅम्पियन बनले.


गंभीर श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियामध्ये सामील होणार-


गंभीर श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील होणार आहे. नुकताच टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा पूर्ण केला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गेले होते. आता संघाचा पुढील कार्य श्रीलंका दौरा आहे, जो 27 जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 सामन्यांची T20 आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.


गौतम गंभीर पुढं कोणतं लक्ष्य?


भारतीय क्रिकेट संघानं आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोनवेळा प्रवेश केला होता. दोन्ही वेळा भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं. आता तिसऱ्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचं टीम इंडियाचं धोरण आहे. या विजेतेपदाच्या अनुषंगानं टीम इंडियाची बांधणी करणं आणि विजेतेपद खेचून आणणं ही गौतम गंभीरवर  जबाबदारी असेल. भारतानं 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा जिंकवणं देखील गौतम गंभीर पुढं आव्हान असेल. 


संबंधित बातम्या:


अंबानींच्या लग्नात हार्दिक पांड्याची हवा...; अभिनेत्री अनन्यासोबत थिरकला, सर्वांत जास्त चर्चेत असणारा Video


हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'