Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटकात टिच्चून मारा करीत भारताला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा भारतीयांसाठी हीरो झाला आहे. पण, असे असले तरी हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच (Natasha Stankovic) यांच्यात आलबेल नसल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. 


 हार्दिक पांड्याचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोवरुन सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्राची सोलंकीने तिच्या सोशल अकाऊंटवरुन हार्दिक पांड्यासोबतचा फोटो शेअर केला होता. प्राची हार्दिकची चाहती असल्याने तिने त्याच्यासोबत फोटोशूट केले. तिने स्वत: हार्दिकसोबतचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. पांड्या कुटुंबियांचे आणि प्राची यांचे चांगले संबंध असल्याचे दिसून येत आहे. मात्र या फोटोनंतर नताशाने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे. 


नताशाच्या पोस्टमध्ये नेमकं काय?


हार्दिकचे फोटो समोर आल्यानंतर नताशानेही इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या जिममध्ये आरशासमोर नाचताना आणि गातानाही दिसते. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले की, "प्रत्येक गोष्टीवर प्रेम करा, पण देवाला विसरु नका." दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती अँडी ग्रामरचे 'Dont Give Up' गाणं गाताना दिसत आहे.


 






हार्दिक आणि नताशामध्ये काहीच आलबेल नाही-


गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात सर्वकाही आलबेल नाही, असा दावा केला जातोय. नताशाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर केल्या होत्या. त्या पोस्टचा आधार घेत या दोघांच्या नात्यातील धुसफुसीचा अंदाज लावला जात होता. विशेष म्हणजे यावेळच्या आयपीएल पर्वात हार्दिक पांड्या मैदानात असताना एकाही सामन्यात नताशा स्टेडियममध्ये दिसली नाही. या कारणामुळेही दोघांच्या नात्याच्या अफवेला हवा मिळाली होती. नताशाने हार्दिकसाठी विश्वचषक जिंकल्याची कोणतीही पोस्ट केलेली नाही. या विजयावर नताशाच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी, हार्दिकच्या मेहुण्याने, म्हणजेच मोठा भाऊ कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माने भारताच्या विजयानंतर हार्दिकसाठी एक भावनिक पोस्ट केली होती. पोस्ट शेअर करत हार्दिकने पंखुरी शर्माला आपला आधारस्तंभ असं म्हटलं आहे.


संबंधित बातमी:


हार्दिक पांड्यासोबत फोटो टाकताच प्रसिद्धीच्या झोतात आली; कोण आहे प्राची सोलंकी?