नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) ने या दशकातील सर्वश्रेष्ठ संघ जाहीर केला असून कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली तर एकदिवसीय आणि टी 20 संघाचा कर्णधार म्हणून महेंद्र सिंह धोनीची निवड केलीय. यांच्या व्यतिरिक्त आर. अश्विन, रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराह यांचाही समावेश या संघात करण्यात आला आहे. विराट कोहली असा एकमेव खेळाडू आहे ज्याला क्रिकेटच्या तिन्ही संघात स्थान मिळालंय. रविवारी आयसीसीनं या संघाची घोषणा केलीय.
कसोटीत भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार
महेंद्र सिंह धोनीनं 2014 साली कसोटी सामन्याचं कर्णधार पद सोडल्यानंतर त्या ठिकाणी विराट कोहलीकडं संघाचं नेतृत्व आलं. विराट कोहलीनं 57 कसोटी सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलंय, त्यामध्ये 33 सामन्यात संघाला विजय मिळालाय. तो भारताचा सर्वाधिक कसोटी सामने जिकणारा कर्णधार आहे.
धोनीचा सन्मान
आयसीसीने टी-20 आणि एकदिवसीय अशा दोन्ही संघाच्या कर्णधारपदी महेंद्र सिंह धोनीची निवड केली आहे. टी-20 संघामध्ये धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराह या चार भारतीयांचा समावेश आहे. टी-20 संघात आयसीसीने रोहित शर्मा, क्रिस गेल,अॅरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल या सहा हिटर्सचा समावेश केलाय.
या भारतीय खेळाडूंना मिळालंय स्थान
आयसीसीच्या दशकातील कसोटी संघात विराट कोहली आणि आर. अश्विनला स्थान मिळालंय. तर दशकातील टी-20 संघात विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच दशकातील एकदिवसीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनीचा समावेश आहे.
आयसीसी दशकातील कसोटी संघ:
अॅलिस्टर कुक, डेविड वॉर्नर, केन विलियमसन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा (विकेटकीपर), बेन स्टोक्स, रविचंद्रन अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अॅन्डरसन.
आईसीसी दशकातील एकदिवसीय टीम:
रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इमरान ताहिर, लसिथ मलिंगा.
आईसीसी दशकातील टी- 20 संघ :
रोहित शर्मा, क्रिस गेल, अॅरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी, कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रित बुमराह, लसिथ मलिंगा
महत्वाच्या बातम्या: