एक्स्प्लोर

Harbhajan Singh Retires: हरभजन सिंह राजकीय इनिंगला सुरुवात करणार? पंजाब निवडणुकीच्या तोंडावर निवृत्तीच्या घोषणा केल्यानं सर्वत्र चर्चा

Harbhajan Singh Retires: भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यानं आज ट्वीटरच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केलीय.

Harbhajan Singh Retires: भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यानं आज ट्वीटरच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केलीय. हरभजन सिंहनं त्याच्या कारकिर्दीत भारताला अनेक सामने जिंकून दिले. भारताचा आक्रमक गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जात असून त्याच्या गोलंदाजीसमोर दिग्गज फलंदाजांनी गुडघे टेकले. दरम्यान, हरभजननं पंजाब निवडणुकीच्या तोंडावर निवृत्तीची घोषणा केल्यानं तो राजकीय इनिंगला सुरुवात करणार असल्याची चर्चेनं जोर धरलाय. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पंजाबमध्ये पुढील वर्षी निवडणुका पार पडणार आहेत. यामुळं हरभजन निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो, अशा चर्चांना उधाण आलंय. 

दरम्यान, हरभजन सिंह काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतो, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांत झळकत होत्या. तसेच काँग्रेसचा पक्ष त्यांना जालंधरमधून उतरवू शकतो, असंही सांगितलं जातं होतं. काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनीही हरभजन लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी हरभजनसोबतचा एक फोटो ट्विट केला होता. या फोटोवर सिद्धू यांनी दिलेलं कॅप्शननं सर्वांच लक्ष वेधून घेणारं ठरलं होतं. 

नवज्योत सिंह यांचं ट्वीट-

सिद्धू आणि हरभजनची भेट
हरभजननं जालंधर येथून निवडणूक लढवली तर, कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. नवज्योत सिंह सिद्धू हे हरभजन यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका कॉमेन फ्रेन्डच्या माध्यमातून सिद्धू आणि हरभजनची भेट झाली होती. हरभजनला पक्षात आणून दोआबा क्षेत्रात सिद्धू मजबूत होण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसनं दिली होती. 

हरभजनची कारकिर्द
हरभजन सिंहनं 1998 मध्ये पदार्पण केलं होतं आणि तो अखेरचा 2016 मध्ये निळ्या जर्सीत दिसला होता. त्यानं भारतीय संघासाठी 103 कसोटी सामने, 236 एकदिवसीय सामने आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेतल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट्सची नोंद आहे. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यानं 25 विकेट्स घेतल्या आहेत. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Asia Cup Rising Stars 2026: आशिया कपचा थरार आजपासून! वैभव-अभिषेकचा धुमाकूळ पाहायला मिळणार, IND vs PAK महामुकाबला कधी? टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर
आशिया कपचा थरार आजपासून! वैभव-अभिषेकचा धुमाकूळ पाहायला मिळणार, IND vs PAK महामुकाबला कधी? टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर
IND vs NZ 1st Test Day-1 : पंतने दिला इशारा, पडिक्कलने हातात आलेला झेल सोडला! निकोल्सला जीवदान, शुभमन गिल भडकला; मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
पंतने दिला इशारा, पडिक्कलने हातात आलेला झेल सोडला! निकोल्सला जीवदान, शुभमन गिल भडकला; मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs NZ 1st Test Day-1 Stumps : अवघ्या 70 धावांत अर्धा संघ तंबूत, तरीही भारतीय गोलंदाजांवर आली रडायची वेळ! निकोल्स-फिलिप्सचा कहर, पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
अवघ्या 70 धावांत अर्धा संघ तंबूत, तरीही भारतीय गोलंदाजांवर आली रडायची वेळ! निकोल्स-फिलिप्सचा कहर, पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Australian 2018 Ball-Tampering Scandal : 7 वर्षं पोटात ठेवलं, अखेर 'त्या' काळ्या दिवसांबाबत कॅमेरून बॅनक्रॉफ्टने सगळंच सांगितलं! टॅम्परिंग प्रकरणात नवे खुलासे, ऑस्ट्रेलियात खळबळ
7 वर्षं पोटात ठेवलं, अखेर 'त्या' काळ्या दिवसांबाबत कॅमेरून बॅनक्रॉफ्टने सगळंच सांगितलं! टॅम्परिंग प्रकरणात नवे खुलासे, ऑस्ट्रेलियात खळबळ

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Embed widget