The Ashes 2021-22 : क्रिकेट जगतातील अत्यंत मानाची स्पर्धा असणाऱ्या अॅशेस मालिकेला (Ashes Series) सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात पहिला सामना सुरु असून पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला आहे. पण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंड संघाला अवघ्या 147 धावांत गुंडाळलं आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत एका डावात 5 विकेट्स टीपल्या आहेत.
सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत त्यांचा हा निर्णय साफ चूकीचा ठरवत अवघ्या 147 धावांमध्ये इंग्लंडच्या सर्व फलंदाजांना तंबूत धाडलं. यावेळी इंग्लंडकडून जोस बटलर (39) आणि ओली पोप (35) यांनी सर्वाधिक धावा केल्या. तर सलामीवीर रॉरी बर्न्स, कर्णधार जो रुट आणि रॉबिनसन हे तिघे शून्यावर बाद झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाची भेदक गोलंदाजी
ऑस्ट्रेलियन संघाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 5 विकेट्स टीपल्या. तर मिचेल स्टार्च आणि जोश हॅजलवुड यांनी प्रत्येकी 2 तर कॅमरॉन ग्रीनने एक विकेट घेतली आहे. विशेष म्हणजे पॅट कमिन्सने 5 विकेट्स घेत 127 वर्ष जुन्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अॅशेस मालिकेत पाच विकेट्स घेण्याची किमया पॅटने केली आहे.
हे देखील वाचा-
- न्यूझीलंडला 372 धावांनी नमवूनही WTC रँकिगमध्ये भारत अव्वल नाही, पाकिस्तान-श्रीलंका क्रिकेट संघ आहे कारण
- IND vs NZ 2nd Test : मूळ मुंबईकर गोलंदाजानं वानखेडेवर टीम इंडियाची उडवली दाणादाण! दिग्गजांना गुंडाळलं...
- India tour of South Africa : भारताविरुद्ध सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज, जाहीर केला 21 सदस्यीय संघ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha