India Tour of South Africa 2021: भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटच्या शिरकावामुळे या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण वेळापत्रकात थोडा बदल करुन दौरा 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने कसोटी सामन्यांसाठी आपला 21 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. 


डीन एल्गरकडे कर्णधारपद


दक्षिण आफ्रीका संघाने डीन एल्गर याच्याकडे कर्णधारपद सोपवलं असून टेम्बा बावुमा उपकर्णधार असणार आहे. यावेळी वेगवान गोलंदाज डुएन ओलिवियर बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन करणार आहे. ओलिवियरने 2019 मध्ये शेवटचा सामना श्रीलंका संघाविरुद्ध खेळला होता. यंदा स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने 8 सामन्यात 28 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय संघाचे स्टार गोलंदाज कगिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया यांच्यासह यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकही संघात आहे.



असा आहे संघ


डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), कगिसो रबाडा, सरेल एर्वी, ब्यूरेन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्करम, वियान मल्डर, एनरिच नॉर्खिया, कीगन पीटरसन, रॅसी वॅन डर डूसन, काइल वेरेने, मार्को जॅनसेन, ग्लेंटन स्टरमॅन, प्रेनेलॅन सुब्रायन, सिसांडा मगाला, रेयान रिकेल्टन, डुएन ओलिवियर.



असा असेल दौरा 



भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये 3 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तर नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेमका दौरा कसा असेल यावर एक नजर फिरवूया...


कसोटी सामन्यांचे वेळापत्रक 



  • पहिला कसोटी सामना -  26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.

  • दुसरा कसोटी सामना -  3 जानेवारी,2022 ते 7 जानेवीर, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.

  • तिसरा कसोटी सामना -  11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन  


एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक 



  • पहिला एकदिवसीय सामना - 19 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल

  • दुसरा एकदिवसीय सामना - 21 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल

  • तिसरा एकदिवसीय सामना - 23 जानेवारी, 2022, न्यू लँड्स, केपटाऊन  


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha