Indian Team For South Africa Tour: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (BCCI) आफ्रिका दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. आज केवळ कसोटी संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा होणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.  


आफ्रिका दौऱ्याची सुरुवात 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीनं होणार आहे. हा सामना  सेंचुरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना  3 ते 7 जानेवरी 2022 दरम्यान जोहान्सबर्गमध्ये तर तिसरा कसोटी सामना  केपटाउनच्या न्यूलँड्समध्ये 11 ते 15 जानेवरी 2022 दरम्यान खेळला जाणार आहे. 


फार्मात नसलेल्या अजिंक्य रहाणेच्या निवडीवर प्रश्नचिन्ह आहे. न्यूझीलंड दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळणं निश्चित आहे. तर दक्षिण आफ्रिकेत इंडिया-ए साठी शानदार प्रदर्शन केलेल्या हनुमा विहारीला देखील संघात स्थान मिळू शकतं.  


इशांतची होऊ शकते सुट्टी
 
100 हून अधिक कसोटी सामने खेळलेल्या इशांत शर्माला या दौऱ्यातून सुट्टी मिळू शकते. त्याच्या जागी  प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खानसारख्या युवा गोलंदाजाला संधी मिळू शकते. सोबतच  जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीची टीममध्ये वापसी होणार आहे. 


अशी असू शकते टीम इंडिया


मयंक अग्रवाल, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, रविंद्र जेडजा, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.


दक्षिण आफ्रिकेचा 21 सदस्यीय संघ जाहीर 


दरम्यान दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने कसोटी सामन्यांसाठी आपला 21 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने डीन एल्गर याच्याकडे कर्णधारपद सोपवलं असून टेम्बा बावुमा उपकर्णधार असणार आहे. यावेळी वेगवान गोलंदाज डुएन ओलिवियर बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन करणार आहे. ओलिवियरने 2019 मध्ये शेवटचा सामना श्रीलंका संघाविरुद्ध खेळला होता. यंदा स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने 8 सामन्यात 28 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय संघाचे स्टार गोलंदाज कगिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया यांच्यासह यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकही संघात आहे.
 
असा आहे संघ 
डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), कगिसो रबाडा, सरेल एर्वी, ब्यूरेन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्करम, वियान मल्डर, एनरिच नॉर्खिया, कीगन पीटरसन, रॅसी वॅन डर डूसन, काइल वेरेने, मार्को जॅनसेन, ग्लेंटन स्टरमॅन, प्रेनेलॅन सुब्रायन, सिसांडा मगाला, रेयान रिकेल्टन, डुएन ओलिवियर.