India U19 WC 2022 : भारतीय अंडर 19 क्रिकेट संघ आगामी अंडर 19 विश्वचषकासाठी (ICC Under 19 Men’s Cricket World Cup) तयार झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकलेला भारत यंदा 5 वं जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघही जाहीर केला असून दिल्लीच्या यश धुल याला कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. पण या भव्य स्पर्धेपूर्वी भारत आशिया कपमध्ये उतरणार आहे. या स्पर्धेतील भारताचे सामने 23 डिसेंबरला सुरु होणार असून यावेळी पाकिस्तानविरुद्धही भारत मैदानात उतरणार आहे. तर या यादीवर एक नजर फिरवूया...


आशिया कपमधील भारताचे सामने -



  1. 23 डिसेंबर- भारत विरुद्ध यूएई

  2. 25 डिसेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान

  3. 27 डिसेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान

  4. 30 डिसेंबर- सेमीफायनल

  5. 31 डिसेंबर- फायनल


आगामी 19 वर्षांखालील विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 या कालावधीत पार पडणार आहे. पण त्यापूर्वी आशिया कप खेळवला जाणार आहे. यावेळी या स्पर्धेत 8 संघ आहेत. ज्यात भारत असलेल्या 'अ' गटात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई हे संघ आहेत. तर 'ब' गटात बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आणि कुवेत हे संघ आहेत. यावेळी प्रत्येक संघ 3 साखळी सामने खेळून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीच्या सामन्यातून विजेता समोर येईल. दरम्यान अंडर 19 विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघालाच या स्पर्धेत भारत खेळवण्याची दाट शक्यता आहे.


अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघ - 


यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशिद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्या यादव (यष्टीरक्षक), राज अंगद बावा, मानक पारख, कौशल तांबे, आर एस हंगरगेकर, वासू वॅट्स, विकी ओत्सवाल, रवी कुमार, गर्व सांगवान


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha