India U19 WC Sqaud 2022 : तब्बल 4 वेळा अंडर 19 विश्वचषक विजेता भारतीय संघ सर्वात यशस्वी अंडर 19 संघ असून आगामी 2022 च्या अंडर 19 विश्वचषकासाठीही (ICC Under 19 Men’s Cricket World Cup) भारत तयार झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतंच ट्वीट करत भारतीय संघ जाहीर केला. भारतीय क्रिकेटच्या कनिष्ठ निवड समितीने वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या 2022 च्या अंडर 19 विश्वचषकासाठी ही संघ निवड केली असून यावेळी कर्णधारपद दिल्लीच्या यश धुल याला सोपवण्यात आलं आहे.


आगामी 19 वर्षांखालील विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 या कालावधीत पार पडणार आहे. यंदाचा हा 14 वा विश्वचषक असून यावेळी एकूण 48 सामन्यांमध्ये 16 संघ चषकासाठी एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरतील. आतापर्यंत अंडर 19 विश्वचषकाच्या इतिहासात भारत सर्वात जास्त विजय मिळवण्यात यशस्वी झाला आहे. भारताने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये विश्वचषक जिंकला होता. यावेळी 2000 साली मोहम्मद कैफच्या, 2008 मध्ये विराटच्या, 2012 मध्ये उन्मुक्त चंदच्या आणि 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली होती. तर 2016 आणि 2020 मध्ये झालेल्या विश्वचषकात भारत उपविजेता ठरला आहे.


अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघ - 


यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशिद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्या यादव (यष्टीरक्षक), राज अंगद बावा, मानक पारख, कौशल तांबे, आर एस हंगरगेकर, वासू वॅट्स, विकी ओत्सवाल, रवी कुमार, गर्व सांगवान



हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha