India Tour of England : टी20 मालिकेवर नाव कोरल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेसाठी भारत सज्ज, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
ENG vs IND : भारत सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून एकमेव कसोटी सामन्यानंतर टी20 मालिकाही पार पडली. ज्यानंतर आता एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.
IND vs ENG, ODI : भारतीय संघ (Team India) आता एकदिवसीय सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. नुकतीच टी20 मालिका 2-1 च्या फरकाने नावावर केल्यानंतर आता भारत आणि इंग्लंड (India vs England) एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना आज सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. यावेळी बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात युवा आणि दिग्गज असे दोन्ही प्रकारचे खेळाडू असल्याने नेमकी कोणाकोणाला संधी मिळेल हे पाहणे महत्त्वाचे असेल, शिवाय भारताची रणनीती कशी असेल, हे देखील पाहावे लागेल. एकदिवसीय संघात यावेळी अर्शदीप सिंह याला पहिल्यांदाच सामिल करण्यात आलं असून त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळेल का? हे देखील पाहावे लागेल.
इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
हे देखील वाचा-