Ind vs SA 3rd ODI Match Score: संजू सॅमसनचं शतक अन् गोलंदाजांची धमाकेदार खेळी; आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा बोलबाला
India vs South Africa 3rd ODI Match Score: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना गुरुवारी पार्ल येथे खेळला गेला. या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं शानदार विजय मिळवत मालिका 2-1 अशी खिशात घातली.
India vs South Africa 3rd ODI Match Score: भारतीय क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) दक्षिण आफ्रिकेत (South Africa) इतिहास रचला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियानं 78 धावांनी विजय मिळवला. यासह केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानं आफ्रिकेला त्याच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत 2-1 नं पराभूत केलं. या सामन्याचा हिरो संजू सॅमसन होता, त्यानं शानदार खेळी करत शतक झळकावलं. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला लक्ष्याचा पाठलाग करूच दिला नाही. या विजयासह टीम इंडियानं इतिहास रचला.
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय वनडे सीरिजमधील हा दुसरा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियानं आफ्रिकेत 8 द्विपक्षीय वनडे सीरिज खेळली होती, त्यापैकी फक्त एकच मालिका जिंकली होती. तिने 2018 मध्ये एकमेव मालिका जिंकली होती. आता 9 पैकी दुसरी मालिका जिंकली आहे.
India's young brigade clinch the ODI series 2-1 after a throughly convincing victory in the final match 👊
— ICC (@ICC) December 21, 2023
📝 #SAvIND: https://t.co/XDucAXYbE6 pic.twitter.com/4LKSUO2mSA
अर्शदीपसमोर आफ्रिकन संघ ढेपाळला
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामनं नाणेफेक जिंकून सर्वात आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियानं 297 धावांचं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.5 षटकांत 2018 धावाच करू शकला. टीम इंडियाकडून टोनी डी जोर्जीनं 87 चेंडूत 81 धावा केल्या. तर कर्णधार एडन मार्करामनं 36 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजानं फलंदाजी केली नाही.
दुसरीकडे, टीम इंडियाच्या सर्वच गोलंदाजांनी धमाकेदार खेळी केली. विशेषत: वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं 4 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला सळो की पळो करुन सोडलं. त्या व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.
असा ढेपाळला दक्षिण आफ्रिकेचा संघ :
पहला विकेट : रीजा हेंड्रिक्स (19), विकेट : अर्शदीप सिंह (59/1)
दुसरा विकेट : रस्सी वैन डर डुसेन (2), विकेट : अक्षर पटेल (76/2)
तिसरा विकेट : एडेन मार्करम (36), विकेट : वॉशिंगटन सुंदर (141/3)
चौथा विकेट : टोनी डी जोरजी (81), विकेट : अर्शदीप सिंह (161/4)
पाचवा विकेट : हेनरिक क्लासेन (21), विकेट : आवेश खान (174/5)
सहावा विकेट : वियान मुल्डर (1), विकेट : वॉशिंगटन सुंदर (177/6)
सातवा विकेट : डेविड मिलर (10), विकेट : मुकेश कुमार (192/7)
आठवा विकेट : केशव महाराज (14), विकेट : अर्शदीप सिंह (210/8)
नववा विकेट : लिजाद विलियमस (2), विकेट : अर्शदीप सिंह (216/9)
संजूच्या शतकामुळेच दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियानं 8 विकेट गमावून 296 धावा केल्या होत्या. टीम इंडियाची सरुवात तशी फारशी चांगली झाली नाही. टीम इंडियानं केवळ 49 धावांत 2 विकेट्स गमावल्या. यानंतर संजू सॅमसन आणि केएल राहुल (21) यांनी 52 धावांची भागीदारी करून डाव थोडा सांभाळला. मात्र, राहुल बाद झाल्यानंतर संजू सॅमसननं टिळक वर्मासोबत 116 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला 200 धावांच्या पुढे नेलं. टिळक 52 धावा करून बाद झाला, पण संजूनं खंबीरपणे उभं राहून 110 चेंडूत कारकिर्दीतलं पहिलं एकदिवसीय शतक झळकावलं. यानंतर संजूही 114 चेंडूत 108 धावा करून बाद झाला. त्यानं 3 षटकार आणि 6 चौकार मारलं. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेकडून ब्युरेन हेंड्रिक्सनं 3 तर नांद्रे बर्गरनं 2 विकेट्स घेतले. तर लिझाड विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.