एक्स्प्लोर

Team India चा जूनमध्ये आयर्लंड दौरा, वेळापत्रक जारी

भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघात दोन टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत.

मुंबई : IPL 2022 नंतर भारतीय क्रिकेट संघ जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 26 जून आणि दुसरा सामना 28 जून रोजी खेळवला जाईल. दोन्ही सामने मलाहाईडमध्ये खेळवण्यात येतील. क्रिकेट आयर्लंडने सोशल मीडियावर भारत-आयर्लंड टी-20 मालिकेचं वेळापत्रक जारी केलं आहे.

भारतासोबतच न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा संघ देखील आयर्लंडचा दौरा करणार आहे. आयर्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात मर्यादित षटकांची मालिकाही खेळणार आहे.

4 वर्षांनंतर आयर्लंडचा दौरा
टीम इंडियाने यापूर्वी 2018 मध्ये आयर्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यातही दोन्ही संघांत दोन सामने खेळवण्यात आले होते. दोन्ही सामन्यात भारताचाच विजय झाला होता. दरम्यान याआधी 2007 मध्ये  भारतीय संघाने पहिल्यांदा आयर्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी दोन्ही संघांमध्ये एकमेवर टी-20 सामना झाला होता, ज्यात भारताने 9 विकेट्सनी विजय मिळवला होता. भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन वनडे सामने देखील झाले होते. या सर्व सामन्यात भारताचा एकतर्फी विजय झाला होता.

आयर्लंड दौऱ्यावर युवा खेळाडूंना संधी?
IPL 2022 नंतर आणि आयर्लंड दौऱ्याच्या आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरोधात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिकात भारतातच होणार आहे. या सामन्यातील सर्व सामने 9 जून ते 15 जून दरम्यान होतील. यानंतर आयर्लंड दौरा होणार असून त्यानंतर तातडीने भारताला इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. भारतीय संघाचं हे व्यस्त वेळापत्रक पाहता आयर्लंड दौऱ्यासाठई भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.


रोहि

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Rohit Sharma Retirement: 'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget