एक्स्प्लोर

Team India Test Squad : मोठी बातमी : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलकडे कर्णधारपदाची धुरा; कोणा कोणाला संधी?

Team India Test Squad : इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे.

Team India Test Squad : आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघाची (Team India) घोषणा झाली आहे. या संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलची (Shubman Gill )  निवड करण्यात आली आहे. तर ऋषभ पंत (Rishabh Pant) हा उपकर्णधार असेल. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याला कसोटी क्रिकेट संघात तरुण नेतृत्व आणि नव्या दमाचे खेळाडू हवे होते. त्यामुळे गौतम गंभीर हा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) भारतीय संघात खेळवण्यासाठी उत्सुक नव्हता. विराट कोहलीला संघात स्थान मिळाले असते तरी त्याच्याकडे कर्णधारपद नसते. यामुळेच विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. (Team India Test Squad)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

शुभमन गिल, कर्णधार

ऋषभ पंत- उपकर्णधार

यशस्वी जयस्वाल

करुण नायर

रवींद्र जाडेजा

वॉशिंग्टन सुंदर

शार्दुल ठाकूर

जसप्रीत बुमराह

मोहम्मद सिराज

आकाश दीप 

कुलदीप यादव

के एल राहुल 

साई सुदर्शन

अभिमन्यू ईश्वरन

ध्रुव जुरेल

प्रसिद्ध कृष्णा

अर्शदीप सिंग

नितीश कुमार रेड्डी

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तडाखेबंद फलंदाजी करणारा आणि ऑरेंज कॅपचा मानकरी साई सुंदरला कसोटी संघात स्थान मिळेल, अशी  आशा होती. तो रोहित शर्माच्या जागी सलामीला येईल, अशी अटकळ बांधली जात होती. ही अटकळ खरी ठरली असून साई सुदर्शनचा भारतीय क्रिकेट संघात स्थान समावेश करण्यात आला आहे.

Team India: भारतीय कसोटी संघात किती फलंदाज?

बीसीसीआयने घोषणा केलेल्या कसोटी संघात शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर  या फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये कोणाला संधी ? 

नितीश रेड्डी, रवींद्र जाडेजा , वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर... शार्दूल बोलिंग ऑल राऊंडर म्हणून भारतीय संघात

Team India Test Team: भारतीय कसोटी संघात कोणते गोलंदाज?

भारतीय कसोटी संघात वेगवान गोलंदाजीची धुरा शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग हे गोलंदाज सांभाळतील. तर फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या दोन फुलटाईम फिरकी गोलंदाजांचा समावेश असेल.

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

पहिली कसोटी: 20-24 जून 2025 - हेडिंग्ले, लीड्स

दुसरी कसोटी: 2-6 जुलै 2025 - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

तिसरी कसोटी: 10-14 जुलै 2025 - लॉर्ड्स, लंडन

चौथी कसोटी: 23-27 जुलै 2025 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी: 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 - द ओव्हल, लंडन

इतर महत्त्वाच्या बातम्या 

SRH vs RCB IPL 2025 : हैदराबादविरुद्ध बंगळुरूचा लाजिरवाणा पराभव! गुणतालिकेत मोठी उलटफेर, बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर घसरली अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला?
महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला?
MVA MNS Mumbai Morcha: तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Mumbai Car Fire: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Local Train: Raj Thackeray लोकलने चर्चगेटला, मतदार यादीतील 'घोटाळ्या'विरोधात MNS चा मोर्चा
Hasan Mushrif ON Voter List: सदोष मतदार याद्यांवरुन निवडणुका नकोत, मुश्रीफांचा घरचा आहेर
Satyacha Morcha Voter List : मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर मविआकडून स्टेजची उभारणी
Satyacha Morcha : मविआ-मनसेच्या सत्याच्या मोर्चाचा मार्ग कसा असेल?
Raj Thackeray Satyacha Morcha : मतदार याद्यांमधील घोळविरोधातील मोर्चासाठी राज ठाकरे लोकलने प्रवास करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला?
महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला?
MVA MNS Mumbai Morcha: तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Mumbai Car Fire: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार! राज ठाकरे मोर्चासाठी लोकलने दाखल, जाणून घ्या प्रत्येक अपडेट, एका क्लिकवर
मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार! राज ठाकरे मोर्चासाठी लोकलने दाखल, जाणून घ्या प्रत्येक अपडेट, एका क्लिकवर
Dharmendra Hospitalised: ‘बॉलिवूडचे ही-मॅन’ धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
‘बॉलिवूडचे ही-मॅन’ धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
MNS MVA Mumbai Morcha: मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा
मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा
Embed widget