टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या ताफ्यात कोट्यवधींची Lamborghini Urus
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या ताफ्यात Lamborghini Urus या नव्या शानदार आणि महागड्या कारची एन्ट्री झाली आहे. याची किंमत कोटींच्या घरात आहे.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जेव्हापासून संघाचं कर्णधारपद सांभाळलं आहे तेव्हापासून त्याने विजयाचा सपाटा लावला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये आता रोहित शर्माचा दबदबा आहे. तीन फॉरमॅटमधील क्रिकेट संघाचा तो कर्णधार बनला आहे. याच दरम्यान टीम इंडियाच्या नव्या कर्णधाराने नवी कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.
रोहित शर्माने Lamborghini Urus खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या कारचा रंग टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगासारखाच म्हणजेच निळा आहे. या निळ्या रंगाला 'ब्लू एलोश' असंही म्हटलं जातं. रोहित शर्माच्या कलेक्शनमध्ये निळ्या रंगाची BMW M5 ही कार आहे. रोहित शर्माच्या या नव्या कारची किंमत 3.10 कोटी रुपये असल्याचं कळतं.
रोहित शर्माला गाड्यांचा शौक आहे. आता टीम इंडियाच्या कर्णधाराच्या ताफ्यात या नव्या शानदार कारची एन्ट्री झाली आहे. रोहितने आपल्या नव्या कारमध्ये आणखी काीही फीचर्स अॅड केले आहेत.
या कारमध्ये स्पोर्टिवो लेदर इंटिरिअर, २२ इंचाची डायमंड रिम्स कटचाही समावेश आहे. देशातील काही लोकांजवळचही ही कार आहे, ज्यात आता रोहितही सामील झाला आहे. रोहितने त्याच्या आवडीनुसार गाडीतील इंटिरिअर केलं आहे. यात रेड-ब्लॅक केबिनचा समावेश आहे. शिवाय गाडीचा डॅशबोर्डही लाल आणि काळ्या रंगाचा आहे.
दरम्यान, रोहित शर्माने नुकताच टी-20 नंतर एकदिवसीय क्रिकेट संघाचाही कर्णधार बनला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया टी-20 आणि वनडे विश्वचषकात खेळणार आहे. यासोबतच सध्याच्या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेईल. टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.