एक्स्प्लोर

Team India Semifinal Scenario : 76 धावांचा घाव अन् स्वप्नांना तडा! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, सेमीफायनलच्या शर्यतीतून OUT?

T20 World Cup 2026 Points Table Update News : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाच्या विजय रथाला अखेर ब्रेक लागला.

Team India Semifinal Scenario News Marathi : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाच्या विजय रथाला अखेर ब्रेक लागला. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे झालेल्या सुपर-8 फेरीतील सामन्यात भारताला 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या मोठ्या धक्क्यामुळे केवळ पराभवच नाही, तर उपांत्य फेरीची समीकरणेही कठीण झाली आहेत.

सेमीफायनलचा मार्ग कठीण (What is Team India's semi-final equation?)

या पराभवानंतर भारतासाठी पुढील प्रत्येक सामना ‘करो किंवा मरो’ असा ठरला आहे. 76 धावांच्या मोठ्या फरकाने झालेल्या पराभवाचा नेट रनरेटवर मोठा परिणाम झाला असून भारताचा नेट रनरेट -3.800 वर घसरला आहे. उलट दक्षिण आफ्रिकेचा रनरेट +3.800 इतका भारी झाला आहे. सुपर-8 फेरीत प्रत्येकी चार संघांचे दोन गट करण्यात आले असून ग्रुप-1 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार असल्याने भारतासाठी पुढील वाटचाल अधिक आव्हानात्मक बनली आहे.

मोठ्या फरकाने विजय अनिवार्य

भारताचे पुढील दोन सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आहेत. हे दोन्ही सामने केवळ जिंकणे पुरेसे ठरणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट रनरेट सुधारावा लागणार आहे. तसेच इतर सामन्यांचे निकालही भारताच्या बाजूने लागणे गरजेचे आहे. संघावर सध्या प्रचंड दबाव असून फलंदाजी क्रम अधिक भक्कम करण्याची गरज आहे. पॉवरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात, मधल्या षटकांमध्ये स्थिर भागीदारी आणि डेथ ओव्हर्समध्ये अचूक नियोजन या गोष्टी अत्यावश्यक ठरणार आहेत.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 187 धावा केल्या. प्रत्युत्तर भारताची फलंदाजी पूर्णपणे कोसळली आणि 18.5 षटकांत 111 धावांवर संपूर्ण संघ आटोपला. परिणामी दक्षिण आफ्रिकेने हा सामना 76 धावांनी जिंकत भारताचा उपांत्य फेरीकडे वाटचाल कठीण करून ठेवली.

भारताच्या पराभवाची कारणे कोणती? (What were the reasons for India's defeat?)

  • या सामन्यात भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची खराब फलंदाजी.
  • लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीची जोडी चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरली, ज्यामुळे दबाव वाढला.
  • पॉवरप्लेमध्ये भारताने तीन विकेट गमावल्या, ज्यामुळे संघाला पुनरागमन करणे कठीण झाले.
  • भारताच्या मधल्या फळीला या स्पर्धेत प्रभावीपणे आपली भूमिका बजावता आली नाही आणि या सामन्यातही तेच दिसून आले.
  • भारताचे एकाच खेळाडूवर अवलंबून राहणे महागात पडले.

हे ही वाचा -

Ind vs Sa Super 8 T20 World Cup 2026 : पराभवानंतर सूर्या खचला! कोणावर फोडलं पराभवाचं खापर?, कॅप्टनने जाहीरपणे नाव घेतलं, म्हणाला...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget