एक्स्प्लोर

पोलिसांच्या विनंतीवरून BCCI ने बदलले भारत-इंग्लंडच्या मालिकेचे वेळापत्रक; नेमकं काय घडलं?, पाहा

India vs England T20 Schedule: भारत आणि इंग्लंड यांच्यात जानेवारी 2025 मध्ये पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल.

India vs England T20 Schedule: भारत आणि इंग्लंड यांच्यात जानेवारी 2025 मध्ये पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 22 जानेवारी रोजी चेन्नई येथे होणार होता. मात्र आता त्याचे ठिकाण बदलले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले की, या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांची ठिकाणे बदलण्यात आली आहेत. कोलकाता पोलिसांच्या आवाहनानंतर हा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 सामन्याचे ठिकाणही बदलले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे तर दुसरा सामना चेन्नईमध्ये होणार होता. पण आता त्याच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. याबाबत कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनकडे मागणी मागितली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त कोलकाता पोलीस तयारी करणार आहेत. पहिला टी-20 सामना 22 जानेवारीला होणार आहे. आता हा सामना चेन्नईऐवजी कोलकात्यात होणार आहे. दुसरा सामना 25 जानेवारीला कोलकाताऐवजी चेन्नईत खेळवला जाईल.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर नवीन वेळापत्रक शेअर केले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना 28 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. चौथा सामना 31 जानेवारीला पुण्यात होणार आहे. पाचवा सामना 2 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर पहिला सामना नागपुरात 6 फेब्रुवारीला होणार आहे. दुसरा सामना 9 फेब्रुवारी रोजी कटक येथे खेळवला जाईल. तिसरा सामना 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे.

भारत-बांगलादेशची मालिका-

भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-20 सामना धर्मशाला येथे होणार होता. मात्र आता त्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. हा सामना मध्य प्रदेशमधील ग्वालियर मैदानावर होणार आहे.

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक-

टी-20 मालिका वेळापत्रक-

पहिला टी 20 सामना :  22 जानेवारी 2025 ,कोलकाता
दुसरा टी 20 सामना :  25 जानेवारी 2025, चेन्नई
तिसरा टी 20 सामना : 28 जानेवारी 2025, राजकोट
चौथा टी 20 सामना :  31 जानेवारी 2025, पुणे
पाचवा टी 20 सामना : 02 फेब्रुवारी 2025, मुंबई

एकदिवसीय मालिका वेळापत्रक-

पहिला एकदिवसीय सामना : 6 फेब्रुवारी 2025, नागपूर
दुसरा एकदिवसीय सामना : 9 फेब्रुवारी 2025, कटक
तिसरा एकदिवसीय सामना :12 फेब्रुवारी 2025, अहमदाबाद 

संबंधित बातमी:

Video: मनू भाकर अन् नीरज चोप्राचं लग्न?; व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापलेOne Minute One Constituency :  01 मिनिट 01 मतदारसंघ :  07 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget