Ind Playing XI vs Eng 1st Test : पहिल्या कसोटीत करुण नायरचं स्थान पक्के, कशी असेल इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग-11?
England vs India Test series 2025 Playing 11 : इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी कोच गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

मुंबई, 6 जून 2025 : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी 5 जून रोजी कसोटी संघाचे कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी गंभीरने अनुभवी आणि एकेकाळचा तिहेरी शतकवीर फलंदाज करुण नायर (Karun Nair) याला चांगलाच पाठिंबा दिला. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग-11मध्ये तो असणार यावर गौतम गंभीर यांनी मोठे आणि महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
करुण नायरची करुण नायरची एन्ट्री पक्की!
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, जेव्हा कोणी खूप धावा करतो तेव्हा आपण त्याला 1-2 कसोटींवरून न्याय देत नाही, जर एखाद्याने खूप धावा केल्या असतील तर आपल्याला त्याला संधी द्याव्या लागतात. करुण नायरचा अनुभव आणि फॉर्म इंग्लंडमध्ये कामी येईल. भारताला हेडिंग्ले लीड्स (Headingley) येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे.
काउंटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी!
टीम इंडियामध्ये नायरचा कसोटी क्रिकेट प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध 303 धावांची शानदार खेळी खेळल्यानंतर, काही महिन्यांतच त्याची लोकप्रियता कमी झाली. 2017 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक होती, जिथे त्याने 3 कसोटी सामन्यांमध्ये फक्त 53 धावा केल्या. त्यानंतर, 2018 च्या इंग्लंड दौऱ्यात तो बेंचवर राहिला आणि त्याला संधी मिळाली नाही.
पण नायरने कधीही हार मानली नाही. तो सतत देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला. 2023 मध्ये करुणने काउंटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली, तर त्यानंतर 2024-25 च्या देशांतर्गत हंगामात त्याने प्रभावी कामगिरी दाखवली, ज्यामध्ये 863 रणजी ट्रॉफी धावा होत्या. या सर्व कामगिरीमुळे त्याची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली.
अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्ध इंडिया अ साठी द्विशतक झळकावणाऱ्या नायरने कसोटी संघातील प्लेइंग-11 साठी आपला दावा आणखी मजबूत केला आहे. आणि आता गंभीरने त्याला पाठिंबा दिल्याने 20 जून रोजी लीड्स (हेडिंग्ली) येथे होणाऱ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश होण्याची शक्यता वाढत आहे.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ - (India Test Squad for England)
कर्णधार : शुभमन गिल
उपकर्णधार आणि विकेटकीपर : ऋषभ पंत
फलंदाज : यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी
ऑलराउंडर : रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
विकेटकीपर : ध्रुव जुरेल
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक- (India vs England Test Series Schedule)
पहिली कसोटी- 20-24 जून, 2025 - हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी- 2-6 जुलै, 2025 - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी- 10-14 जुलै, 2025 - लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी- 23-27 जुलै, 2025 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी- 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 - द ओव्हल, लंडन



















