Team India New Head Coach: कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर (KKR) आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची मंगळवारी बीसीसीआयच्या सल्लागार समितीने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी काल मुलाखत झाली. झूम कॉलद्वारे ही मुलाखत झाली. सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. सधा सुरु असलेल्या 2024 च्या टी 20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत नवीन प्रशिक्षकाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 


गौतम गंभीरसोबत माजी भारतीय खेळाडू वेंकट रमन (Woorkeri Venkat Raman) यांचीही मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुलाखत झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु गौतम गंभीरची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. तसेच वेंकट रमन यांनी मुलाखतीत आगामी काळातील भारतीय संघाच्या वेळापत्रक पुढील कार्यक्रमाचे चांगले सादरीकरण केल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून कोणाची निवड होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 




जॉन्टी रोड्स यांचा फिल्डिंग कोचसाठी अर्ज- 


दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि महान क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स यांनी भारतीय संघाचे फिल्डिंग कोच होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांनी 2019 लादेखील फिल्डिंग कोचसाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळेचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आर. श्रीधर यांना पहिली पसंती दिली होती. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टी. दिलीप यांची फिल्डिंग कोच म्हणून निवड केली होती. जॉन्टी रोड्स सध्या लखनौ सुपर जायंट्सचे फिल्डिंग कोच आहेत.


नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ किती?


टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून सुरू होईल, जो 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडिया एकूण 5 ICC ट्रॉफी खेळणार आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2 चषकांचा समावेश आहे.


गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द -


गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 व-नडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वन-डेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये  4154 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: W,0,0,0,0,0,0,0,0,0,0,0,0,W,0,0,0,0,0,W,0,0,0,0; लॉकी फर्ग्युसनचा डोकं फिरवणारा रेकॉर्ड!


T20 World Cup 2026: भारतात रंगणार आगामी टी20 विश्वचषकाचा थरार; अमेरिका, आयर्लंडसह 12 संघ पात्र, पाहा संपूर्ण यादी