T20 World Cup 2024: W,0,0,0,0,0,0,0,0,0,0,0,0,W,0,0,0,0,0,W,0,0,0,0; लॉकी फर्ग्युसनचा डोकं फिरवणारा रेकॉर्ड!
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 39 वा सामना न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळला गेला.
T20 World Cup 2024 Lockie Ferguson
1/10
टी-20 विश्वचषक 2024 चा 39 वा सामना न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळला गेला. न्यूझीलंडने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. (Photo Credit-ICC)
2/10
पण याहीपेक्षा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या लॉकी फर्ग्युसनच्या शानदार गोलंदाजीची चर्चा होत आहे. (Photo Credit-ICC)
3/10
लॉकी फर्ग्युसन हा टी20 विश्वचषकाच्या इतिहासात चार षटकांत स्पेलमध्ये सर्व षटके निर्धाव टाकले. चारही षटकं निर्धाव टाकणारा लॉकी फर्ग्युसन हा पहिला गोलंदाज ठरला. (Photo Credit-ICC)
4/10
लॉकी फर्ग्युसन हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात चार षटकं टाकणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. (Photo Credit-ICC)
5/10
यापूर्वी, पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फक्त एकदाच घडले होते, जेव्हा कॅनडाच्या साद बिन जफरने 2021 मध्ये पनामाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या संपूर्ण चार षटकांत एकही धाव दिली नाही.(Photo Credit-ICC)
6/10
पहिल्याच षटकांत 3 विकेट्स- लॉकी फर्ग्युसनने पापुआ न्यू गिनीचा कर्णधार असद वालाला पहिल्याच चेंडूवर 6 धावांवर बाद करून शानदार सुरुवात केली. यानंतर, त्याने पुढच्या फलंदाजाला धावा करू दिल्या नाहीत आणि पॉवरप्लेमध्येच पहिले निर्धाव षटक टाकले. त्यानंतर पॉवरप्लेनंतर त्याला षटक टाकण्याची संधी मिळाली. (Photo Credit-ICC)
7/10
फर्ग्युसनने पुन्हा किफायतशीर गोलंदाजी करत आणखी एक निर्धाव षटक टाकले. फर्ग्युसनने 12व्या षटकात पुनरागमन केले आणि 17 धावा देणाऱ्या चार्ल्स अमिनीची विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. यानंतर त्याने 14व्या षटकात चाड सोपरला बाद करून तिसरा विकेट मेडेन पूर्ण केला. (Photo Credit-ICC)
8/10
ट्रेंट बोल्टने घेतली निवृत्ती- न्यूझीलंडचा क्रिकेटर ट्रेंट बोल्टचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा शेवटचा सामना होता. त्याच्या शेवटच्या सामन्यात त्याने 4 षटकात 14 धावा देत 2 बळी घेतले होते. (Photo Credit-ICC)
9/10
न्यूझीलंडचा डाव संपल्यानंतर बोल्ट म्हणाला की, देशासाठी खेळणे ही आपल्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असल्याचे त्याने सांगितले.(Photo Credit-ICC)
10/10
टीम साऊदीसोबतची आपली मैत्री आणि त्याच्यासोबत 12 वर्षे खेळणे ही सन्मानाची बाब असल्याचेही बोल्टने सांगितले. आपला संघ विश्वचषकाच्या पुढील टप्प्यात पोहोचू शकला नाही म्हणून बोल्ट निराश दिसत होता.(Photo Credit-ICC)
Published at : 18 Jun 2024 11:53 AM (IST)