सरकारी नोकरी, भूखंड...; तेलंगणा सरकारने टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजसाठी पेटारा उघडला!
Team India Mohammad Siraj: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकतीच मोहम्मद सिराजची भेट घेतली.
![सरकारी नोकरी, भूखंड...; तेलंगणा सरकारने टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजसाठी पेटारा उघडला! Team India Mohammad Siraj Telangana CM Revanth Reddy felicitating Mohammad Siraj for winning the T20 World Cup 2024 सरकारी नोकरी, भूखंड...; तेलंगणा सरकारने टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजसाठी पेटारा उघडला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/6158237121d6f1558ea394176b89ebb31720578196833987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Team India Mohammad Siraj: मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) हा टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा (Indian Cricket Team) भाग होता. मोहम्मद सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यादरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकतीच मोहम्मद सिराजची भेट घेतली. यावेळी रेवंत रेड्डी यांनी मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड देण्याची घोषणा केली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोहम्मद सिराजची भेट घेऊन त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. यासोबतच मोहम्मद सिराजला सरकारी नोकरीचीही घोषणा करण्यात आली. हैदराबादमध्ये घर बांधण्यासाठी मोहम्मद सिराजला जमीन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यावेळी मोहम्मद सिराजने रेवंत रेड्डी यांना टीम इंडियाची जर्सी भेट दिली. मोहम्मद सिराज आणि रेवंत रेड्डी यांच्या भेटीत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनही उपस्थित होता. तेलंगणाच्या सीएमओने या बैठकीची छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर केला आहे.
Telangana CM felicitating Mohammad Siraj for winning the World Cup. 🇮🇳🏆pic.twitter.com/3zIpQF9xii
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 9, 2024
मोहम्मद सिराज हा मूळचा तेलंगणाचा-
मोहम्मद सिराज हा मूळचा तेलंगणाचा आहे. टीम इंडियापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात सिराजने घातक गोलंदाजी केली होती. यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. सिराजच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास उत्कृष्ट राहिलेली आहे. सिराजने भारतासाठी 41 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत 68 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 27 कसोटी सामन्यात 74 बळी घेतले आहेत. सिराजने भारतासाठी 13 टी-20 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत.
मुंबई विजयी परेड-
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर खेळाडू मुंबईला रवाना झाले. मुंबईतील मेन इन ब्लूने मरीन ड्राईव्ह ते आयकॉनिक वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन बस विजय परेड काढली. उत्साही चाहत्यांच्या जयजयकार, जल्लोष आणि टाळ्यांच्या गजरात, संघ वानखेडे स्टेडियमवर गेला, जिथे त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली.
संबंधित बातम्या:
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)