Rinku Singh : 19 षटकार, 21 चौकार, आगरकरने ज्याची आशिया कपमध्ये सगळ्यात शेवटी निवड केली, त्याच खेळाडूने उडवून दिली खळबळ
Team India Asia Cup 2025 : आशिया कप 2025 साठी रंगमंच सजला आहे. 9 सप्टेंबरपासून यूएईत 8 संघ जेतेपदासाठी लढतील.

UP T20 League Rinku Singh : आशिया कप 2025 साठी रंगमंच सजला आहे. 9 सप्टेंबरपासून यूएईत 8 संघ जेतेपदासाठी लढतील. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियामध्ये संधी मिळवणारा एक खेळाडू सध्या आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत आहे. यूपी टी20 लीगमध्ये त्याने खेळलेल्या काही खेळ्या पाहून फॅन्स वेडे झाले. गंमत म्हणजे हा तोच खेळाडू आहे, ज्याला टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
19 ऑगस्ट रोजी एशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली, तेव्हा मुख्य निवड समिती प्रमुख अजीत आगरकर यांनी पहिले 14 नावं जाहीर केली पण या खेळाडूचं नाव त्यात नव्हतं. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. मात्र 15वे नाव म्हणून त्याची घोषणा होताच सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला. विचारविनिमय करून शेवटी त्याला संघात स्थान मिळाले आणि आता तोच खेळाडू आशिया कपच्या आधी धडाकेबाज कामगिरी करून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पक्कं करण्याच्या मार्गावर आहे.
𝙍𝙞𝙣𝙠𝙪’𝙨 𝙍𝙖𝙢𝙥𝙖𝙜𝙚 in Ekana tonight! 78* off 48.
— UP T20 League (@t20uttarpradesh) August 30, 2025
Watch live on SonyLIV and Sony Sports Network. #UPT20League #ANAXUPT20League #KhiladiYahanBantaHai #KRvsMM pic.twitter.com/Xcl0xyvQbp
तो खेळाडू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर रिंकू सिंग. त्याला संघात एक अतिरिक्त फलंदाज म्हणून संधी मिळाली आहे. त्यामुळे सरळ पहिल्या अकरात त्याला खेळवणं कठीण मानलं जात होतं. विशेषतः रिंकू मिडल ऑर्डरमध्ये, पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करतो आणि या क्रमांकासाठी हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल आधीच दावेदार आहेत. पण रिंकूच्या सध्याच्या तुफानी फॉर्ममुळे त्याला थेट सुरुवातीपासूनच संघात खेळवण्याची मागणी वाढली आहे.
30 ऑगस्टला झालेल्या सीझनच्या 27व्या सामन्यात रिंकू सिंगने गोरखपूर लायन्सविरुद्ध अप्रतिम खेळी साकारली. पाचव्या क्रमांकावर उतरून त्याने अवघ्या 48 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 78 धावा ठोकल्या. त्याच्या या विजेच्या खेळीमुळे मेरठच्या संघाने 136 धावांचं लक्ष्य फक्त 15.4 षटकांत 3 गडी राखून सहज गाठलं. रिंकूची ही फटकेबाजी पहिल्यांदाच नाही. याआधीही या हंगामात त्याने शतक ठोकत आपली धडाकेबाज छाप सोडली आहे.
यूपी टी-20 लीग 2025 मध्ये रिंकू सिंगची कामगिरी
जर आपण यूपी टी-20 लीग 2025 मध्ये रिंकू सिंगची कामगिरी पाहिली तर, या स्टार खेळाडूने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत, 7 डावांमध्ये 295 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 59.00 आणि स्ट्राईक रेट 170.52 होता. रिंकूने 21 चौकार आणि 19 षटकार मारले. येणाऱ्या सामन्यांमध्ये हे आकडे आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. या हंगामातील 9 व्या सामन्यात रिंकूने गोरखपूर लायन्सविरुद्ध 48 चेंडूत 108 धावा केल्या, ज्यामध्ये 8 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.





















