Watch : झारखंडच्या माँ देवरी मंदिरात दर्शनासाठी एमएस धोनी, सर्व भाविकांसोबत गर्दीतून घेतलं दर्शन, पाहा VIDEO
MS Dhoni : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी झारखंडच्या प्रसिद्ध माँ देवरी मंदिरात दर्शनासाठी पोहोचून तिथल्या पूजेत सामील झालेला दिसून आला. त्याचा हा दर्शनाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Dhoni visits Dewri Maa Temple : भारतीय क्रिकेटपटू (Team india) सध्या आध्यात्मिक दौऱ्यावर दिसत आहेत. अलीकडेच विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत ऋषिकेश येथील एका आश्रमात दिसला. तसंच सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर यांनीही विविध प्रसिद्ध मंदिरांना भेट दिली होती. ज्यानंतर आता माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी (MS Dhoni) झारखंडच्या प्रसिद्ध माँ देवरी मंदिरात (Dewri Maa Temple) दिसला आहे. मंदिरात त्याने इतर भाविकांसोबत गर्दीत उभं राहून दर्शन घेतल्याचं दिसून आलं.
एमएस धोनी माँ देवरीच्या पूजेत सहभागी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे तो त्याच्या काही जवळच्या मित्रांसोबत गेल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये धोनीची बॅक हेअरस्टाईलही दिसत आहे. रांची येथे नुकत्याच झालेल्या भारत-न्यूझीलंड T20 सामन्यातही धोनी स्टेडियममध्ये दिसला होता.
पाहा धोनीचा दर्शन घेतानाचा VIDEO
View this post on Instagram
IPL 2023 मध्ये मैदानात दिसणार धोनी
एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता जवळपास 3 वर्षे उलटली आहेत. तरीही त्याची फॅन फॉलोइंग आजही तितकीच आहे. तसंच त्याने अजूनही आयपीएलमध्ये खेळणं सुरूच ठेवले आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार म्हणून धोनी अजूनही मैदान गाजवतो. दरम्यान, आयपीएल 2023 मध्येही तो खेळण्याची पूर्ण शक्यता आहे. या मोसमातही चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद त्याच्याकडेच असणार आहे.
फलंदाजीसह यष्टीरक्षणाचा सराव सुरू
धोनी सध्या आयपीएल व्यतिरिक्त कोणतंही क्रिकेट खेळत नाही. पण तो नियमितपणे फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सराव करत असतो. झारखंडमधील जेएससीए स्टेडियममध्ये तो घाम गाळताना दिसत असतो. याशिवाय टेनिस, बॅडमिंटन आणि इतर खेळातूंनही तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवत आहे.
रांची येथे टीम इंडियाची घेतली होती भेट
पहिल्या टी20 सामन्यासाठी जेव्ह भारतीय संघ रांची येथे पोहोचला होता तेव्हा धोनीने (MS Dhoni) आवर्जून खेळाडूंची भेट घेतली. दरम्यान, या भेटीचा व्हिडीओ बीसीसीआयनं त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्याला कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, 'पाहा टीम इंडियाला रांची येथे भेटण्यासाठी कोण आलं आहे महान एम.एस. धोनी.' दरम्यान, या व्हिडीओवर नेटकरीही बऱ्याच कमेंट्स करताना दिसत होते. व्हिडीओत धोनी ईशान किशन, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांच्याशी खास गप्पा-टप्पा करताना दिसून आला होता.
Look who came visiting at training today in Ranchi - the great @msdhoni! 😊#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/antqqYisOh
— BCCI (@BCCI) January 26, 2023
महत्त्वाच्या इतर बातम्या :