बांगलादेशचा माजी कॅप्टन म्हणाला भारतासोबतचा वाद चर्चेतून मिटवा, बीसीबीचा संचालक म्हणाला हा तर भारताचा एजंट, क्रिकेटपटू संतापले
Tamim Iqbal called Indian agent by BCB director: बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक एम नजमुल इस्लाम यांनी त्यांच्याच देशाच्या खेळाडूला भारताचा एजंट म्हटलं आहे.

नवी दिल्ली : बांगलादेशचा माजी कॅप्टन तमीम इकबाल यानं भारत आणि बांगलादेशमधील क्रिकेटच्या संबंधातील तणाव चर्चेनं कमी करावा असं म्हटलं होतं. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक एम नजमूल इस्लाम यांनी तमीम इकबालला भारतीय एजंट म्हणून त्याची खिल्ली उडवली. गेल्या काही दिवसांपासून बीसीबी आमि बीसीसीआय आमने सामने आले आहेत. बीसीसीआयच्या आदेशानं कोलकाता नाईट रायडर्स संघानं मुस्तफिजूर रहमानला संघातून वगळावं लागलं. बांगलादेशनं आयपीएलच्या सामन्यांचे प्रसारण करण्यावर देखील बंदी घातली आहे. आयसीसीनं टी 20 वर्ल्ड कपमधील सामने श्रीलंकेत खेळण्यास परवानगी द्यावी, असं बांगलादेशनं म्हटलं आहे.
द डेली स्टारच्या अनुसार तमीमनं म्हटलं होतं की, तो बीसीबीसोबत जोडलेला नाही, कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणं मीडियातून माहिती मिळाली आहे. मात्र, जे लोक हे प्रकरण पाहत आहेत, त्यांच्याकडे अधिक माहिती नसेल, असं तमीम इकबाल म्हणाला. मला अचानक प्रतिक्रिया द्यायची नाही, मात्र, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बांगलादेश क्रिकेटच्या हिताचा, भविष्याचा आणि इतर गोष्टींचा विचार केला पाहिजे. जर एखादी गोष्ट चर्चेतून सुटत असेल तर त्यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही, असं तमीम इकबाल म्हणाला होता.
तमीम इकबाल यानं सप्षटपणे म्हटलं की बांगलादेश क्रिकेटला 90 ते 95 टक्के पैसे आयसीसीकडून मिळतात, त्यामुळं कोणतंही वक्तव्य सार्वजनिकपणे करण्यापूर्वी त्याचा विचार करावा, असं वक्तव्य करुन नये ज्यातून मागं हटणं अडचणीचं ठरेल, असं तमीम इकबाल म्हणाला होता.
बीसीबीच्या संचालकाचं वादग्रस्त वक्तव्य
बीसीबीचे संचालक एम नजमुल इस्लाम यांनी कमेंट करत एक फोटो शेअर करत तमीम इकबाल याला इंडियन एजंट म्हणत खिल्ली उडवली. बीसीबीच्या अधिकाऱ्या कमेंटमुळं बांगलादेशमधील क्रिकेट चाहते संतापले आहेत. तमीमसह इतर खेळाडू देखील संतापले आहेत.
मोमिनुल हक, तस्कीन अहमद आणि तैजुल इस्लाम यासह इतर खेळाडूंनी सोशल मिडिया पोस्ट करत बीसीबीच्या संचालकाचा विरोध केला. तस्कीन यानं म्हटलं की
क्रिकेट बांगलादेशचा प्राण आहे. एका माजी कॅप्टनबद्दल एक कमेंट करण्यात आली, ज्यानं खेळात मोठं योगदान देण्यात, यामुळं अनेक लोकांनी संताप व्यक्त केला.
बांगलादेशच्या तस्कीन अहमद यानं म्हटलं की मला वाटत एका माजी राष्ट्रीय खेळाडूबाबत अशी कमेंट करणं बांगलादेश क्रिकेटच्या हिताचं नाही. मला वाटतं संबंधित संचालक या प्रकरणाला गांभीर्यानं घेतील आणि भविष्यात जबाबदारीनं वागतील.
मोहम्मद सैफुद्दीन यानं पोस्ट शेअर करत म्हटलं की तमीम बद्दल नज्मुलच्या कमेंटचा विरोध केला. तैजुल इस्लाम यानं म्हटलं की बीसीबीच्या संचालकांनी माजी कॅप्टन तमीम इकबाल याबाबत कमेंट केली हे हैराण करणार आहे. मी या कमेंटचा विरोध करत आहे. एका जबाबदारीच्या पदावर असताना सार्वजनिक कमेंट करताना बोर्डाच्या संचालकांनी व्यावसायिकता, नैतिकता आणि वर्तनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तैजुल इस्लाम यानं पुढं बीसीबीच्या संचालकांनी सार्वजनिकपणे माफी मागावी, असं म्हटलं. संचालकांचं वक्तव्य चुकीचं असून देशातील क्रिकेट विश्वासाठी अपमानजनक असल्याचं तैजुल इस्लाम म्हणाला.




















