T20 World Cup 2nd Semi Final: टी-20 विश्वचषक 2021 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाशी (PAK vs AUS) भिडणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात आज हा सामना रंगणार आहे. मात्र, या महत्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाला चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. पाकिस्तानचे स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक यांची तब्येत बिघडलीय. हे दोघेही आजच्या सामन्यापूर्वी सराव करण्यासाठी मैदानात आले नाहीत. यामुळं पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण पाहायला मिळतंय.
रिझवान आणि मलिक यांना हलका ताप आल्याचे पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनानं सांगितलंय. ज्यामुळं या दोघांनी बुधवारी सराव सत्रात भाग घेतला नाही. या दोघांना संघाबाहेर ठेवण्यात आलंय. महत्वाचे म्हणजे, रिझवान आणि मलिक यांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली. या दोघांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याचे सांगितलं जातंय.
रिझवान- मलिकची टी-20 विश्वचषक 2021 मधील कामगिरी-
टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या संघानं जबरसस्त कामगिरी करून दाखवलीय. पाकिस्ताननं आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. यापैकी सर्व सामने पाकिस्ताननं जिंकले आहेत. पाकिस्तानच्या विजयात सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. रिझवान या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह मोहम्मद रिझवानं संघाला दमदार सुरुवात करून दिलीय. त्याने भारतीय संघाविरुद्ध दमदार खेळी करून दाखवली होती.
शोएब मलिकची संयमी खेळी-
या टी-20 विश्वचषकात शोएब मलिकनं पाकिस्तानसाठी संयमी खेळी केलीय. त्यानं न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध निर्णायक खेळी खेळल्या. शोएबनं स्कॉटलंडविरुद्ध धडाकेबाज अर्धशतकही झळकावलं. त्याचं अर्धशतक पाकिस्तानकडून टी-20 मधील सर्वात जलद अर्धशतक होतं. या विश्वचषकात शोएबचा स्ट्राईक रेट 187 इतका आहे.
यामुळं दोन्ही खेळाडू तंदुरुस्त राहणे पाकिस्तानच्या संघासाठी अत्यंत गरजेचं आहे. जर हे दोन्ही खेळाडू संघाबाहेर राहिल्यास पाकिस्ताला सलामी आणि मधली फळी कमजोर होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या-
- PAK vs AUS : पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलिया रोखणार का? आज दुसरा उपांत्य सामना
- ENG vs NZ, Match Highlights: न्यूझीलंड फायनलमध्ये दाखल, इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव
- Mumbai Police: विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणारा गजाआड, हैदराबादमधून अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha