Rape Threats to Virat Kohli's Daughter Case: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बुधवारी अटक केलीय. रामनागेश अलिबथिनी असं आरोपीचं नाव आहे. मुंबईच्या सायबर सेल पोलिसांनी हैदराबादमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी रामनागेश हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याची माहिती मिळत आहे. मात्र,  टी-20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. त्यानंतर सोशल मीडियावर विकृतांनी विराटवर राग व्यक्त करताना त्याच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही सोडले नाही. या दरम्यान सोशल मीडियावर व्यक्त होताना पातळी कशी सोडली जाते? हे या ट्रोलर्सकडून पाहायला मिळालं. 


विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी केली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. त्यानंतर भारतीय संघाविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळल्याची पाहायला मिळालं. याचदरम्यान, आरोपीने विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. यानंतर क्रिडाविश्वात एकच खळबळ माजली. तर, अनेक क्रिकेटपटूंनी अशा वक्तव्यांना निषेध दर्शवलाय.


दिल्ली महिला आयोगाची पोलिसांना नोटीस
विराट कोहलीच्या मुलीवर बलात्काराच्या करण्याच्या धमक्यांची दिल्ली महिला आयोगानं दखल घेतली. तसेच दिल्ली महिला आयोगानें पोलिसांनाही नोटीस पाठवली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हटलं. स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस देताना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.


महेंद्रसिंह धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणारा गजाआड-


आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली होती. आरोपी गुजरातमधील कच्छ येथे राहणारा आहे. पोलिसांनी कच्छमधूनच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने धोनी आणि त्याची पत्नी साक्षीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बलात्काराची धमकी देणारे मेसेज केले होते.


हे देखील वाचा-