ENG vs NZ, ICC T20 WC 2021: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडनं इंग्लंडला 5 विकेट्सनं पराभूत केलंय. या विजयासह न्यूझीलंडच्या संघानं अंतिम सामन्यात प्रवेश केलाय. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, इंग्लंडच्या संघाने 20 षटकात 4 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. इंग्लंडच्या संघानं दिलेलं लक्ष्य न्यूझीलंडच्या संघानं एकोणीसव्या षटकातच पूर्ण केलंय.


नाणेफेक गमवल्यानंतर इंग्लंडच्या संघाकडून जोस बटलर (24 बॉल 29 धावा), जॉनी बेअरस्टो (17 बॉल 13 धावा), डेविड मलान (30 बॉल 41 धावा), मोईन अली (37 बॉल 51 धावा), इऑन मॉर्गन (2 बॉल 4 धावा), लियाम लिव्हिंगस्टोनने 10 बॉलमध्ये 17 धावा केल्या. ज्यामुळं इंग्लंडच्या संघाने 20 षटकात 5 विकेट्स गमावून 167 धावा केल्या. न्यूझीलंडच्या संघाकडून टीम साऊथी, मिल्ने, ईश सोडी आणि निशाम यांना प्रत्येकी एक- एक विकेट्स मिळाली. 


या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडच्या संघाकडून मैदानात आलेल्या मार्टीन गप्टील (3 बॉल 4 धावा), डॅरिल मिशेल (47 बॉल 72 धावा, नाबाद), केन विल्यमसन (11 बॉल 5 धावा), डेव्हन कॉनवे (38 बॉल 46 धावा), ग्लेन फिलिप्स (4 बॉल 2 धावा), जेम्स निशाम (11 बॉल 27 धावा) आणि मिचेल सॅन्टनर 1 बॉल 1 धावा केल्या. ज्यामुळे न्यूझीलंडच्या संघानं 5 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. इंग्लंडच्या संघाकडून क्रिस वोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोननं प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतले. तर, अदिल राशिदला एक विकेट्स मिळाली आहे. 


हे देखील वाचा-