ICC T20 World Cup 2024 Team India: टीम इंडियाची पहिली तुकडी 25 मे रोजी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2024 ) रवाना झाली आहे. यामध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह अनेक खेळाडू आणि संघ कर्मचारी सहभागी झाले होते. उर्वरित खेळाडू आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यानंतर रवाना होतील. 


भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) अमेरिकेला रवाना होणाऱ्या खेळाडूंच्या पहिल्या तुकडीत स्थान मिळू शकले नाही. काही महत्त्वाच्या पेपरवर्कला होणारा विलंब हे त्याचे कारण होते. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजासारखे खेळाडू मुंबईत पोहोचले आणि प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बाकीच्या टीमसोबत निघून गेले, पण विराट कोहली तिथे दिसला नाही. यानंतर विराट कोहली 30 मे रोजी पेपरवर्क पूर्ण करून अमेरिकेला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 1 जून रोजी होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात विराट कोहली खेळणं कठीण असल्याचं दिसून येत आहे. 






हार्दिक पांड्या लंडनमध्येच!


विराट कोहलीशिवाय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याही पहिल्या तुकडीत गेला नाही. हार्दिक पांड्या सध्या लंडनमध्ये असून तेथून थेट संघात सामील होणार आहे. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, त्यानंतर पाच दिवसांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होईल.


विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये


विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे संघाला नक्कीच काही त्रास होऊ शकतो, पण त्याचा फॉर्म पाहून भारतीय चाहते खूप खूश आहेत. IPL 2024 मध्ये विराटने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. या मोसमात तो ऑरेंज कॅपसाठीही पात्र ठरला आहे. त्याने 15 सामन्यात 741 धावा केल्या, त्याची सरासरी 61.75 आणि स्ट्राइक रेट 153 पेक्षा जास्त होता. त्याची आयपीएल कारकिर्दीतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.


टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ :


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज


राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.


भारतीय संघाचे वेळापत्रक


5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 


संबंधित बातम्या:


Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाचा प्रश्न; नताशाने दिले 4 शब्दात उत्तर, काय म्हणाली?, पाहा Video


IPL 2024 SRH VS RR: हैदराबादचा विजय होताच काव्या मारन नाचू लागली; धावत जाऊन त्याला पहिले मिठी मारली, पाहा Video


Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्याचे वासे फिरले! पोटगी म्हणून नताशाला 70 टक्के संपत्ती देणार?, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण