Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गेल्या काही काळापासून चर्चेचा मोठा विषय आहे.आयपीएल 2024 मध्ये त्याची कामगिरी खूपच निराशाजनक होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असताना हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये फ्लॉप ठरला. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.


हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) घटस्फोट घेणार असल्याची सध्या चर्चा रंगली आहे. मात्र घटस्फोटाबाबत हार्दिक पांड्या किंवा नताशा यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. याचदरम्यान नताशा पांड्याकडून 70 टक्के प्रॉपर्टी घेणार असल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा बरेच दिवस एकत्र दिसले नाहीत. दोघांनी 14 फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर शेवटचा फोटो शेअर केला होता. 


रिपोर्टनुसार, पांड्याला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के नताशाला द्यावी लागेल. यासंदर्भात अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअरही करण्यात आल्या आहेत. तसेच 'एक्स'वर (आधीचे ट्विटर) हार्दिक पांड्या आणि नताशा घटस्फोट म्हणून ट्रेंडही होत आहेत. हार्दिक कोट्यवधीच्या मालमत्तेचा मालक आहे. आयपीएलसाठी मिळालेल्या मॅच फीसह तो इतर अनेक मार्गांनी कमाई करतो.






हार्दिक पांड्या किती कमावतो?


पांड्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्याला संघाकडून फी म्हणून 15 कोटी रुपये मिळतात. यापूर्वी तो गुजरात टायटन्सचा भाग होता. गुजरातचा संघही पांड्याला तेवढीच रक्कम द्यायचा. यासोबतच त्याला भारतीय क्रिकेट संघाकडून मॅच फी देखील मिळते. पांड्याची कमाई करोडोंमध्ये आहे. 


वडोदरा आणि मुंबईत करोडोंची घरं-


हार्दिक पांड्याने मुंबईत एक अपार्टमेंट घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी हे घर 30 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यासोबतच त्यांचे वडोदरा येथे पेंटहाऊस आहे. त्याची किंमतही करोडोंमध्ये आहे. हार्दिक पांड्या विविध ब्रँडच्या जाहिरातींमधून सुमारे 55-60 लाख रुपये कमावतो. हार्दिकने Halaplay, Gulf Oil, Star Sports, Gillette, Jaggle, Sin Denim, D:FY, Boat, Oppo, Dream11, Reliance Retail, Villain आणि SG क्रिकेटला मान्यता दिली आहे.


संबंधित बातम्या:


IPL 2024 Hardik Pandya: हार्दिक पांड्या आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; कुठून किती कमावतो?, जाणून घ्या...!