Natasa Stankovic :  हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची बायको नताशा (Natasa Stankovic) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना चांगलाच जोर आलाय. नताशाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन पांड्या हे आडनाव काढून टाकलंय. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचंही म्हटलं जातंय. त्यातच आयपीएलच्या हंगामात यंदा हार्दीक पांड्याने मुंबईच्या संघाचं कर्णधार पदं सांभाळलं होतं. पण एरवी प्रत्येक सामना पाहण्यासाठी मैदानात हजर असणारी नताशा ही यंदाच्या आयपीएलच्या एकाही सामन्याला दिसली नाही. त्यातच आता सोशल मीडियावर नताशाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये नताशा तिच्या एका मित्रासोबत लंच डेटवर गेली असल्याचं दिसतंय. 


हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच हार्दीक आणि तिच्या घटस्फोटाच्या चर्चांनाही चांगलाच जोर धरलाय. त्यामुळे खरंच या दोघांमध्ये काही बिनसलं आहे की या केवळ अफवा आहेत, हा प्रश्न अनेकांना पडलाय. पण यावर हार्दीक आणि नताशा या दोघांनाही यावर अद्याप कोणतंही भाष्य केलं नाहीये. नताशा आणि हार्दीक यांना अगस्त्य नावाचा एक मुलगा देखील आहे. 






नताशा स्टॅनकोविकनं हार्दिकचं नाव हटवलं


सर्बियाची मॉडेल असलेल्या नताशा स्टॅनकोविकनं हार्दिक पांड्यासोबत लग्न केलं होतं. नताशा स्टॅनकोविकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमधील नावातून हार्दिक पांड्यांचं नाव हटवलं आहे. यामुळ हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चा वाढल्या. आयपीएलच्या 17 व्या पर्वात नताशा स्टॅनकोविक हार्दिकला पाठिंबा देण्यासाठी एकाही मॅचला उपस्थित नव्हती.   


व्हलेंटाइन डे नंतर नताशा स्टॅनकोविकनं तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसवर हार्दिक पांड्यासोबतचा फोटो शेअर केलेला नाही. नताशाच्या वाढदिवशी हार्दिक पांड्यानं तिला सदिच्छा देखील दिल्या नव्हत्या अशा चर्चा आहेत. त्यामुळं हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. 


हार्दिक पांड्याचा जुना व्हिडीओ व्हायरल


हार्दिक पांड्याला नताशा स्टॅनकोविकला पोटगी म्हणून त्याच्या संपत्तीच्या 70  टक्के  संपत्ती द्यावी लागेल, अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर हार्दिक पांड्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हार्दिक पांड्या त्यामध्ये त्याची संपत्ती आणि कार त्याच्या आईच्या नावावर असल्याचं म्हणत आहे. 


ही बातमी वाचा : 


Natasa Stankovic : कुणीतरी रस्त्यावर येणार... नताशा स्टॅनकोविकची सूचक इन्स्टाग्राम स्टोरी, नेमका रोख कुणाकडे?