IPL 2024 SRH VS RR Qualifier 2: आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) राजस्थान रॉयल्सचा (RR) 36 धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने अंतिम सामन्यात प्रवेश केला. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हैदराबादने फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 175 धावा केल्या. हैदराबादकडून हेन्रिच क्लासेनने 34 चेंडूत 50 धावा केल्या. तर मॅथ्यू हेडने 28 चेंडूत 34 धावा केल्या. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि मॅथ्यू हेडला चांगली सुरुवात करता आली नाही. हैदराबादने 120 धावांवर 6 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर शाहबाज अहमद आणि क्लासेनने चांगली भागिदारी करत हैदराबादला 175 धावांवर पोहचवले.
हैदराबादची फलंदाजी सुरु असताना संघाची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) नाराज असल्याची दिसून आली. 120 धावसंख्येवर 6 विकेट्स गमावल्यामुळे काव्या मारन टेन्शनमध्ये दिसत होती. मात्र दुसऱ्या डावात हैदराबादच्या फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा करत राजस्थानवर वर्चस्व ठेवले. संघाचे हे पुनरागमन पाहून मालकिण काव्या मारन आनंदाने नाचताना दिसली. हैदराबादचा विजय झाल्यानंतर काव्या मारनने प्रथम वडिलांना जाऊन मिठी मारली.
विजयानंतर काव्याने काय केलं? (Celebrations from Kavya Maran after sealing the Final)
जेव्हा सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला तेव्हा संघाची मालकीण काव्या मारनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विजयानंतर काव्याने मागे धावत जाऊन तिचे वडील कलानिधी मारन यांना मिठी मारली. हैदराबादने शेवटच्या वेळी 2018 च्या मोसमात अंतिम फेरी गाठली होती. 2016 मध्ये, सनरायझर्स हैदराबादने केवळ एकदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
राजस्थानचा डाव कसा होता?
176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. टोम कोडमोर फक्त 10 धावांवर बाद झाला. त्याने त्यासाठी 16 चेंडू खर्च केले. संजू सॅमसन यानेही 11 चेंडूत फक्त 10 धावाच केल्या. पॅट कमिन्स याने कोडमोर याला बाद केले, तर अभिषेक शर्माने संजूचा अडथळा दूर केला. रियान पराग 10 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. यशस्वी जायस्वाल आणि ध्रुव जुरेल यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतरही ध्रुव जुरेल याने एकाकी झुंज दिली. जुरेल याने 160 च्या स्ट्राईक रेटने शेवटपर्यंत झुंज दिली. जुरेल याने 35 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली.