एक्स्प्लोर

टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा

T20 World Cup 2024 Semi-final : आयसीसी टी20 विश्वचषक 2024 बद्दल नवी माहिती समोर आली आहे. यंदाच्या विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

T20 World Cup 2024 Semi-final : आयसीसी टी20 विश्वचषक 2024 बद्दल नवी माहिती समोर आली आहे. यंदाच्या विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. पण उपांत्य सामन्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. दुसरा उपांत्य सामना पावसामुळे प्रभावित झाला तर 250 मिनिट अतिरिक्त वेळ ठेवण्यात आलाय. म्हणजे पावसामुळे दुसऱ्या उपांत्य सामन्यात व्यत्यय आला तर खेळ चार तास पुढे ढकलला जाऊ शकतो. या नियमासोबतच इतरही अनेक नियामांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या टी20 विश्वचषकाचं यजमानपद वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशाकडे आहे. 20 संघामध्ये टी20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. 

दोन जून 2024 पासून टी20 विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी होणार आहे, तर दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी पार पडणार आहे. क्रिकबजच्या एका रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. जर पावसामुळे सामना प्रभावित झाला तर चार तासांपर्यंत खेळ पुढे ढकलला जाऊ शकतो. पहिल्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 

पावसामुळे उपांत्य सामना रद्द झाला तर फायदा कुणाचा ? 

पावसामुळे उपांत्य सामना रद्द झाला तर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला फायदा होणार आहे. सुपर 8 फेरीमध्ये सर्वात आघाडीवर असणाऱ्या संघाला फायनलचं तिकिट मिळेल. पण सामना तेव्हाच रद्द होईल, जेव्हा सामना खेळवण्याची परिस्थिती नसेल. याचा निर्णय पंच घेतील.  मैदानाचा आढावा घेतल्यानंतरच सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी भारतीय वेळानुसार रात्री 8.30 वाजता सुरु होणार आहे. 

पहिल्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस - 

टी20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी त्रिनिदाद येथील मैदानात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजता खेळवण्यात येणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. जर हा सामना जर पावसामुळे 26 जून रोजी होऊ शकला नाही, तर 27 जून रोजी होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी बारबाडोस येथे होणार आहे. 

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Embed widget